पुण्याच्या 'सिरम'कडून 5 कोटींची मागणी करणाऱ्या स्वयंसेवकालाच द्यावे लागणार 100 कोटी रूपये

दैनिक गोमंतक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

याबाबत चेन्नईमधील या स्वयंसेवकाने केलेले आरोप दुर्भाग्यपूर्ण आणि चुकीचे आहेत असे स्पष्टीकरण सिरमकडून देण्यात आले असून संबंधित स्वयंसेवकांवर त्यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे.

पुणे- येथील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाच्या संभाव्य 'कोविशील्ड' लशीच्या संदर्भात गंभीर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकाच्या विरोधात 100 कोटी रूपयांच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. चेन्नईमधील या 40 वर्षीय स्वयंसेवकाने भारतात सुरू असणाऱ्या कोविशील्ड लशीच्या चाचण्यांमध्ये सहभाग घेतला होता. यानंतर त्याने या लशीमुळे आपली मेंदूची क्षमता कमी झाल्याचे गंभीर आरोप करून 5 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागितली होती. याबरोबरच ही लस सुरक्षित नसल्याचे आरोपही केले होते. 

दरम्यान, याबाबत चेन्नईमधील या स्वयंसेवकाने केलेले आरोप दुर्भाग्यपूर्ण आणि चुकीचे आहेत असे स्पष्टीकरण सिरमकडून देण्यात आले असून संबंधित स्वयंसेवकांवर त्यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. सिरमने त्याचे विधान गांभीर्यपूर्ण घेत त्याच्या आरोग्याप्रति सहानाभूती व्यक्त केली. मात्र, त्याची मेडिकल कंडिशन आणि या ट्रायलचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वयंसेवक आपल्या मेडिकल कंडिशनच्या मागे लशीची ट्रायल असल्याचे सांगून चुकीचे आरोप करत असल्याचे सांगत असल्याचे सिरमकडून स्पष्ट करण्यात आले.     

स्वयंसेवकावर काय दावा ठोकण्यात आलाय? 

100 कोटी रूपयांच्या मानहानीबरोबरच एक अपराध केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या स्वयंसेवकाला लवकरच नोटीस पाठवण्यात येणार असून त्याला याबाबत जाब विचारण्यात येणार असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, संबंधित स्वयंसेवक हा चुकीचे आरोप करून एका प्रतिष्ठित कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे.  

ट्रायलचा नेमका कोणता टप्पा सुरू आहे?

लशीवरील संशोधनासाठी सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राझेनेकाशी संलग्न केले आहे. यात तयार करण्यात येत असणाऱ्या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू असून यात शेकडो स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली होती. चेन्नईतील या स्वयंसेवकावरही तिसऱ्या टप्प्यातील हा प्रयोग करण्यात आला होता.    
 

संबंधित बातम्या