कुंभमेळ्यात 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कुंभमेळ्य़ात भाविकांनी कोरोना नियमांना तिलांजली दिल्यामुळे प्रशासन हतबल झालं आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे सरकार आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडत असताना आणखी एक चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी शाही स्नान पार पडलं. बाराव्या दिवशी पवित्र स्नानासाठी भाविकांना गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्य़ात भाविकांनी कोरोना नियमांना तिलांजली दिल्यामुळे प्रशासन हतबल झालं आहे.

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच पाश्वभूमीवर हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असल्याने प्रचंड गर्दीमध्ये नियमांची अमंलबजावणी करताना प्रशासनाची धांदल उडत आहे. सोमवारी कुंभमेळ्यातील शाहीस्नान पार पडले. गंगेतील पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये सुमारे 28 लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 18,169 भाविकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (102 devotees corona positive in Aquarius)

West Bengal Election 2021: थेट निवडणूक आयोगाच्याच विरोधातच ममता बॅनर्जी यांचे...

कुंभमेळा सुरु असलेल्या परिसरामध्ये कोरोना नियमांच्या पालबद्दल पाहणी करण्यात आली. तेव्हा कुठेही मास्कची सक्ती करण्यात आली असल्याचे आढळून आलेले नाही. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणीमध्ये रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आले आसल्याचे दिसून येत आहे. उत्तराखंडसह इतर राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला 386 रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
 

संबंधित बातम्या