बंगळुरूच्या एकाच इमारतीतील तब्बल 103 रहिवाशांना कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

बंगळुरुच्या बोम्मनहल्ली परिसरातील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सुमारे 103 रहिवाशांनी सोसायटीत आयोजित केलेल्या पार्टीनंतर कोरोनाची लागण झाली आहे.

बंगळुरू :  बंगळुरुच्या बोम्मनहल्ली परिसरातील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सुमारे 103 रहिवाशांनी सोसायटीत आयोजित केलेल्या पार्टीनंतर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या झालेल्या एकूण 103 व्यक्तींपैकी 96 जण 60 वर्षांच्या पुढील वयोगटातील आहेत. 4 फेब्रुवारीला एसएनएन लेक व्ह्यू अपार्टमेंटमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्याला बहुतेक रहिवाशांनी हजेरी लावली होती.

लखनऊ एसटीएफ पोलिसांनी उधळला घातपाताचा मोठा कट  

बृहन् बेंगलुरू महानगरपालिकेचे (बीबीएमपी) आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद या वृत्ताला दुजोरा दिला आहे.“आम्ही अपार्टमेंटमधील 1052 रहिवाशांची तपासणी केली आहे. एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,इतरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीबीएमपीने सकारात्मक चाचणी आलेल्यांना अलग ठेवणे यासह विविध उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या बाहेरील लोकांशी आम्ही संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर करत आहोत.”, असं  ते म्हणाले.

टूलकिट प्रकरणी निकिता जेकबचा मोठा खुलासा; न्यायालयाने जामीनासाठीच्या याचिकेवरचा निकाल ठेवला राखून 

बेंगळुरू नागरी संस्थेने तेथील रहिवाशांना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूचा प्रकार बाहेरून आलेल्यापैकी आहे, की सामान्य आहे हे जाणून घेण्यासाठी तपासणीचे नमुने करण्यासाठी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एण्ड न्यूरोसायन्सिस Mental Health and Neurosciences (NIMHANS) ला पाठविले आहेत. या इमारतीततील काही रहिवाशांनी त्यांना डेहराडूनला जायचे असल्याने कोरोनाची चाचणी करून घेतली आसता, ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित बातम्या