PM Kisan Scheme: या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रु. होणार ट्रान्सफर

कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशसह, गोव्यासह 5 राज्यांमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत.
10th installment date of PM Kisan Samman Nidhi
10th installment date of PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi 10th Installment: जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशसह, गोव्यासह 5 राज्यांमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच सरकार या महिन्याच्या अखेरीस पीएम किसान सन्मान निधीचा 10वा हप्ता जाहीर करू शकते.

15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रांन्सफर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये ट्रान्सफर करण्यात येते. या आर्थिक वर्षाचा 9 वा आणि दुसरा हप्ता 9 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान मोदींनी जारी केला होता. त्याचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत 9व्या हप्त्यांतर्गत आतापर्यंत 10 कोटी 65 लाख 56 हजार 218 शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत. आता 10वा हप्ताही लवकरच पाठविण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

10th installment date of PM Kisan Samman Nidhi
PM नरेंद्र मोदी यांची 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट

कोणता हप्ता कधी मिळाला

  1. PM किसान योजना 1ला हप्ता फेब्रुवारी 2019 मध्ये जारी करण्यात आला

  2. PM किसान योजना 2रा हप्ता 2 एप्रिल 2019 रोजी जारी करण्यात आला

  3. PM किसान योजनेचा 3रा हप्ता ऑगस्ट 2019 मध्ये जारी करण्यात आला.

  4. PM किसान योजनेचा 4था हप्ता जानेवारी 2020 मध्ये जारी करण्यात आला.

  5. PM किसान योजनेचा 5 वा हप्ता 1 एप्रिल 2020 रोजी जारी

  6. PM किसान योजनेचा 6 वा हप्ता 1 ऑगस्ट 2020 रोजी जारी करण्यात आला.

  7. PM किसान योजनेचा 7वा हप्ता डिसेंबर 2020 मध्ये जारी करण्यात आला.

  8. PM किसान योजनेचा 8वा हप्ता 1 एप्रिल 2021 रोजी जारी करण्यात आला.

  9. PM किसान योजनेचा 9 वा हप्ता 09 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आला आहे.

10th installment date of PM Kisan Samman Nidhi
PM मोदींनी पोप फ्रान्सिस यांची घेतली भेट; भारतभेटीचे दिले निमंत्रण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com