Karnatakaमध्ये कोविडमुळे 115 मुले अनाथ

कोविड -19 चा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे
Karnatakaमध्ये कोविडमुळे 115 मुले अनाथ
115 children orphaned in Karnataka due to Covid19 Dainik Gomantak

बंगळूर: कोविड -19 (Covid-19) चा सर्वाधिक फटका मुलांना (children) बसला आहे. काही जणांनी या विनाशकारी साथीमुळे आपल्या पालकांना गमावले आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या (Karnataka Government) आकडेवारीनुसार 1मार्च 2020 ते यावर्षी ऑगस्ट दरम्यान कोविडमुळे 115 मुले अनाथ (orphaned) झाली आहेत.

दोन बालकांना सरकारी संचालित बाल संगोपन संस्थांमध्ये (CCI) ठेवण्यात आले आहे. इतरांना जिल्हा बाल कल्याण समित्यांनी (CWC) त्यांच्या विस्तारित कुटुंबांकडे सोपवले आहे. कोविडमुळे अनाथ झालेल्या 115 मुलांपैकी 113 मुले बाल सेवा योजनेसाठी पात्र असल्याचे आढळले, ज्याची घोषणा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या वर्षी मे महिन्यात केली होती. कर्नाटक सरकारने केरळमधून येणाऱ्या लोकांसाठी आपल्या कोविड -19 प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केली आहे. कर्नाटकमध्ये गुरूवारी 1,240 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद झाली आहे तर 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद काल करण्यात आली.

115 children orphaned in Karnataka due to Covid19
COVID-19: या 10 देशांमधून भारतात येणाऱ्यांसाठी आरोग्य मंत्रालयाची नवी नियमावली

कर्नाटकमध्ये गुरुवारी कोविड -19 च्या नव्या प्रकरणांची संख्या ताज्या 1,240 झाल्याने तापर्यंत एकून 29.52 लाख कोविड रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण मृतांची संख्या 37,361 वर गेली आहे. काल 1,252 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 28,96,079 वर पोहचली आहे. असे आरोग्य विभागाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.बेंगळुरू 319 प्रकरणे आणि चार मृत्यूची नोद जाली आहे. केरळच्या सीमेला लागून असलेला दक्षिण कन्नड जिल्ह्यात 264 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करण्यात आलेल्या लसींची संख्या 4.39 कोटी झाली असून गुरुवारी 2,47,409 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

115 children orphaned in Karnataka due to Covid19
Karnataka: बी. एस. येडीयुरप्पांचा एकला चलो रे' चा नारा..!

दरम्यान दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील एका गर्दीच्या लसीकरण केंद्रात 19 वर्षीय रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काही मिनिटांच्या आत कोविशील्डचे दोन डोस दिले गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या डोसचा त्याच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसला तरी त्याला आरोग्य सेवकांच्या देखरेखीखाली 24 तास ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com