मेघालयात ममता दीदींचा काँग्रेसला दे धक्का, 12 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश

कॉंग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 18 आमदार होते, त्यापैकी 12 आमदार आता तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत त्यामुळे आता काँग्रेसऐवजी तृणमूल काँग्रेस मेघालयचा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.
मेघालयात ममता दीदींचा काँग्रेसला दे धक्का, 12 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश
12 congress MLA from Meghalaya join TMC in attendance of Mamata Banerjee Dainik Gomantak

मेघालयमध्ये काँग्रेस (Meghalaya Congress) पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसच्या (Congress) एकूण 18 पैकी 12 आमदारांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जे काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आले. त्यात मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangma) यांचाही समावेश आहे. राज्यात ते काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात.या प्रवेशानंतर पश्चिम बंगालनंतर (West Bengal) मेघालय हे दुसरे राज्य आहे, जिथे तृणमूल काँग्रेसचे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे सभापतींकडे सुपूर्द केले आणि यासोबतच टीएमसीमध्ये सामील होण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. (12 congress MLA from Meghalaya join TMC)

मुकुल संगमा यांनी सप्टेंबरमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. मात्र, ही बैठक कधी झाली, याबाबत दोन्ही पक्षांनी दुजोरा दिला नाही. मात्र, त्यांची भेट झाल्याचे संगमा यांनी निश्चितपणे सांगितले होते. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हिन्सेंट पाला यांच्यावर मुकुल संगमा प्रचंड नाराज असल्याचीही माहिती समोर येत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सातत्याने पक्षाचा विस्तार करत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत काँग्रेसचे अनेक नेते तृणमूलच्या पक्षात सामील झाले आहेत. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते देशभरात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यापूर्वी, 23 नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते कीर्ती आझाद, हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज नेते अशोक तंवर, जनता दल (युनायटेड)चे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी काल ममता बॅनर्जी नुकत्याच दिल्लीत पोहोचल्या आहेत आणि तिथेच त्यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे.

12 congress MLA from Meghalaya join TMC in attendance of Mamata Banerjee
भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS कडून जीवे मारण्याची धमकी

मेघालयमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत, त्यापैकी 40 आमदार भारतीय जनता पक्षाच्या समर्थन असलेल्या NDA आघाडीचे आहेत. त्याच वेळी, कॉंग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 18 आमदार होते, त्यापैकी 12 आमदार आता तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. या आमदारांची संख्या एकूण आमदारांच्या दोनतृतीयांश एवढी आहे. अशा परिस्थितीत या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही आणि त्यामुळे आता काँग्रेसऐवजी तृणमूल काँग्रेस मेघालयचा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

पश्चिम बंगालपासून देशाच्या इतर राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याच्या शक्यता शोधत असलेल्या तृणमूल काँग्रेससाठी हे मोठे यश आहे. तृणमूल काँग्रेसने मोठ्या संख्येने काँग्रेसचे आमदार फोडण्यात यश मिळवले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय नोंदवल्यानंतर तृणमूल काँग्रेसने इतर राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करणार असल्याचे आधीच सांगितले आहे. पक्षाने त्रिपुरामध्येही दार ठोठावले असून आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यातही उमेदवार उभे करणार आहेत . गोव्यात तृणमूल काँग्रेस चांगलीच सक्रिय झाली असून पक्षाने अनेक दिग्गजांना पक्षात समाविष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com