वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

नवीन वर्षानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली दरम्यान, चेंगराचेंगरी झाली.
12 pilgrims have died during  stampede at Katra in Jammu

12 pilgrims have died during stampede at Katra in Jammu

Dainik Gomantak

Vaishno Devi Temple Stampede: जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर ही घटना घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन वर्षानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. वरिष्ठ अधिकारी आणि श्राइन बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अधिका-यांनी सांगितले की अनेक लोक मृत आढळले आणि त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये दिल्लीतील लोकांचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील कटरा कम्युनिटी हेल्थ सेंटरचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितले की, माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच या ठिकाणी प्रवासही बंद करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने, चेंगराचेंगरीत आपला जीव गमावले प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई म्हणूव PMNRF कडून दोन लाख आणि जखमी लोकांना 50,000 रुपये देणार असल्याचे ट्विट करून सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला

माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अत्यंत दु:ख झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. शोकग्रस्त कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमी लवकर बरे होतील अशी प्रार्थना त्यांनी केली. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com