12 वर्षीय मुलीने बनवला कोरोना व्हायरसला नष्ट करणारा मास्क

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

दिगंतिका​  बोस  हिने असा मास्क बनवलाय की जो कोरोना व्हायरसला नष्ट करतो. हा मास्क आता मुंबईच्या गूगल म्यूजियम डिजाइन एक्सीलेंसमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (second wave) हाहाकार माजवला आहे. त्यादरम्यान बंगालच्या एका 12 वर्षीय मुलीने धक्कादायक दावा केला आहे. दिगंतिका बोस हिने असा मास्क (Masks) बनवलाय की जो कोरोना व्हायरसला (corona virus) नष्ट करतो. हा मास्क आता मुंबईच्या गूगल म्यूजियम डिजाइन एक्सीलेंसमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिगंतिकाने बनवलेला मास्क हा तीन लेयर असलेला आहे. त्यात निगेटिव आयन जेनरेटर आहे, जो धुळीतील कण फिल्टर (filter) करतो. हि फिल्टर झालेली हवा दुसऱ्या लेयरमध्ये  प्रवेश करते, नंतर हवा तिसऱ्या लेयरमध्ये  जाते. तिसरा लेयर हा केमिकल चेंबर आहे. यामध्ये साबण आणि पाण्याचे मिश्रण आहे. हे कोरोना  व्हायरसला नष्ट करू शकतो. (A 12-year-old girl made a mask to destroy the corona virus)

"सरकार सकारात्मकतेच्या नावाखाली खोटा अजेंडा चालवते आहे"

तिसऱ्या चेंबरमध्ये हवा जाताच पाणी  आणि साबनाचे मिश्रण नष्ट कोरोनाला  शकतो. म्हणून जेव्हा हवा तिसऱ्या लेयरमध्ये पोहोचते तेव्हा त्यामध्ये असलेल्या रासायनिक  मिश्रण  कोरोना व्हायरसला नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे जेव्हा संक्रमित व्यक्ती हा मास्क वापरेल तेव्हा दुसऱ्याला कोरोनाच संसर्ग होणार नाही. दिगंतिकाने सांगितले आहे की,  मास्कच्या चाचणीसाठी तिने राज्य आरोग्य विभागाकडे संपर्क साधला आहे. त्यांना खात्री आहे की हा मास्क कोरोनाविरिद्ध लढा देण्यासाठी  एक चांगला पर्याय आहे. 

दिल्लीला कोवॅक्सिन लसीचे डोस द्यायला नकार; उपमुख्यमंत्री सिसोदिया आक्रमक
  
दिगंतिका म्हणाली की कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तिने हा मास्क बनवला  होता. त्यावेळी देशात लॉकडाउन होता. अशा परिस्थितीत मिळालेल्या वस्तुपासूनच हा मास्क बनवला होता. दिगंतिकाने यापूर्वी देखील अशी उपकरणे बनविली आहे. यापूर्वी तिने सुंदरबनच्या स्थानिकांसाठी एक चश्मा तयार केला होता. एखादी व्यक्ती मागे न वळता पाहू शकते. हे स्थानिक लोकाना प्राण्यांपासून वाचवण्यासाठी होता. दिगंतिकाला तीन वेळा एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट अवॉर्डही  मिळाला आहे. 

संबंधित बातम्या