कर्नाटकात काळ्या बुरशीचा हाहाकार! एका दिवसात 1250 रूग्णांची नोंद

black fungus
black fungus

बेंगलुरु: देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट(corona second wave) आता कमी होत असल्याचे दिसत आहे पण कोविड(Covid-19) मुळे मरणाऱ्यांच्या संख्येत घट होत नाहीये. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, काळ्या बुरशीचे प्रमाण देखील साथीच्या रोगासारखेच वाढत आहे. अनेक राज्यात काळी बुरशी साथीचा रोग म्हणून जाहीर करण्यात आला आहेत. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 1.52 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर या चोवीस तासात जवळपास 3128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कर्नाटकात काळ्या बुरशीचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटकात(karnataka) गेल्या चोवीस तासांत काळ्या बुरशीचे(black fungus) 1250 नवे रूग्ण आढळले आहेत. तसच राज्यात काळ्या बुरशीबरोबरच कोरोनाचाही मोठअया प्रमाणात प्रसार होतो आहे.(1250 cases of black fungus in one day in Karnataka)

कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराशी देश झूंजत असतांनाच काळ्या बुरशीची मोठी समस्या उदयास आली आहे. बघता बघता या आजाराने रौद्र रूप घारण केलं आणि साथीचे रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पीडित असलेल्या आणि त्यातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये दिसून आले आहे. रूग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकमधील दोन मुलांमध्ये ब्लॅक फंगसचे रूग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि बेल्लारी येथील मुलांमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. दोन्ही मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. काळ्या बुरशीचे आजार झालेल्या दोन मुलांपैकी एक 11 वर्षांचे व दुसरे 14 वर्षाचे आहे. 11 वर्षांचा मुलगा हा चित्रदुर्ग येथील आहे. मुलाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांना मुलाचा डोळा काढावा लागला. त्याचबबरोबर काळ्या बुरशीच्या संपर्कात आलेल्या एका 14 वर्षीय मुलाचे नाव  समोर आले असून हा मुलगा बेल्लारीचा आहे.

दोन्ही मुलांना कोविडची लागण झाली होती
कर्नाटकातील काळ्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण असल्याची नोंद आहे. दोन्ही मुलांना टाइप 1 मधुमेहाचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे आणि 15 दिवसांपूर्वी याची याचे निदान लावले गेले आहे. हा संसर्ग मेंदू आणि डोळ्यांपर्यंत पोहोचला असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चित्रदुर्ग येथिल या 11 वर्षांच्या मुलाला ताप आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याला टाइप 1 मधुमेह असल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांला कोविड-19 चा ही संसर्ग झाला होता, जो अँटीबॉडी चाचणीद्वारे उघडकीस आला.

बेल्लारी येथील 14 वर्षीय मुलीला कोविड-19 च्या उपचारासाठी बेल्लारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जेव्हा त्याला रुग्णालयातून सोडण्यात येत होते तेव्हा त्याला डोळ्याचा त्रास सुरू झाला. आणि त्याने डोळ्याच्या दुखण्याबद्दल तक्रार केली ज्यामुळे डॉक्टरांना बुरशीजन्य संसर्ग झाल्याचा संशय आला त्यांनी टेस्ट केली असता या आजाराची अखेर खात्री झाली. 

राज्यात काळ्या बुरशीचे सुमारे 1,250 प्रकरणे नोंदली गेली आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या 1193जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी 18जण बरे झाले आहेत तर 39. जणांचा मृत्यू झाला आहे.  
दरम्यान, कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात आतापर्यंत बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या एम्फोटेरिसिन-बी औषधाच्या सुमारे 10,000 कुपी मिळाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com