सुरतमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 15 कामगारांना ट्रकने चिरडलं; 13 जणंचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

आज पहाटे गुजरातच्या सुरतमधील कोसांबा इथं फुटपाथवर झोपलेल्या पंधरा कामगारांना भरधाव आलेल्या एका ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे.

सुरत :  आज पहाटे गुजरातच्या सुरतमधील कोसांबा इथं फुटपाथवर झोपलेल्या पंधरा कामगारांना भरधाव आलेल्या एका ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे.  ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये धडक झाल्यानंतर ट्रकचालकाचा तोल गेला आणि त्याचे वाहन मांडवी महामार्गावरील पदपथावरील झोपलेल्या लोकांवर चढले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, या अपघातात आतापर्यंत 13 कामगारांचा मृत्यू झाला आहे.सर्व मृत कामगार राजस्थानमधील बांसवाडा येथील आहेत.

भाजप नेते ओम बिर्ला यांनी घटनेनंतर पीडितांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. "गुजरातच्या सुरत येथे एका भीषण अपघाताविषयी माहिती मिळाली. पदपथावर झोपलेले अनेक कामगार मरण पावले. दुर्घटनेतील सर्व शोकांतिकेच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत मिळावे अशी प्रार्थना करतो," असे प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

पीएमओने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. "सुरतमध्ये ट्रक अपघातामुळे झालेली जिवीतहानी ही अत्यंत दु:खदायक आहे. शोकांतिका आहे. माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या