टीएमसीच्या गुंडानी केली भाजपच्या 130 कार्यकर्त्यांची हत्या- अमित शहा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

पश्चिम  बंगालच्या  मुख्यमंत्री  ममता  बॅनर्जी या  गुंडांच्या  बळावर  निवडणूका जिंकतात. आत्तापर्यंत भाजपच्या 130 कार्यकर्त्यांची निर्घूण  हत्या झाली आहे.

कुचबिहार: देशात  शेतकरी आंदोलनावरुन राजकीय  वातावरण  ढवळून  निघत असताना भाजपने आगामी  काळात  होऊ घातलेल्या पश्चिम  बंगालमधील निवडणूकांचे  रणशिंग  फुंकले  आहे. बंगाल  विधानसभा  निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर  राजकीय  वातावरण  चांगलंच  तापलं  आहे. भाजप  आणि  ममता  बॅनर्जी  यांच्यात  जोरदार  संघर्ष  पहायला मिळत आहे. केंद्रीय  गृहमंत्री  अमित  शहा  यांनी  कुचबिहारमध्ये  एका  सभेत  बोलत  असताना  तृणमूल  कॉंग्रेसवर जोरदार  हल्लाबोल  केला, ‘’पश्चिम  बंगालच्या  मुख्यमंत्री  ममता  बॅनर्जी या  गुंडांच्या  बळावर  निवडणूका जिंकतात. आत्तापर्यंत भाजपच्या 130 कार्यकर्त्यांची निर्घूण  हत्या झाली आहे. मात्र अद्याप  तरी  ममता  बॅनर्जी  यांच्याकडून  कोणत्याही  प्रकारची कारवाई  करण्यात  आलेली  नाही.'' असा आरोप  त्यांनी  यावेळी तृणमूल कॉंग्रेसवर  केला.

भारत- चीन सीमावादाबाबत राजनाथ सिंह यांनी दिली महत्त्वाची माहीती

ते पुढेही  म्हणाले, ‘’जर  बंगालमध्ये  जय  श्रीराम  म्हणणार  नाही  तर पाकिस्तानात म्हणणार  का  असा  प्रश्न  देखील  अमित  शहा  यांनी  उपस्थित  केला. निवडणूक संपेपर्यंत ममता  बॅनर्जी  सुध्दा  जय श्रीराम म्हणतील. ममता बनर्जी या काही विशिष्ट वर्गाची मते मिळवण्य़ासाठी असं करत आहेत. त्याचबरोबर अमित शहा  यांनी  कुचबिहारच्या सभेत मोठी  घोषणा  केली, भाजपची बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच एका आठवड्यात आयुष्यमान योजना लागू करण्यात येईल. ममता बॅनर्जी यांनी केंद्राने लागू केलेली आयुष्य़मान योजना  बंगालमध्ये  लागू  होण्यास  रोख  लावला आहे.''
''बंगालच्या  मुख्मंत्री  ममता बनर्जी  या  पंतप्रधान यांच्या  बरोबर  कायम  भांडत असतात. सुभाषचंद्र  बोस  यांच्या  जयंतीनिमित्त आयोजीत  केलेल्या  कार्यक्रामात  वाद  घातला  होता. सुभाषचंद्र  बोस  यांच्या  कार्यक्रमात  त्यांनी  राजकारण  करायला  नको  होतं  मात्र त्यांनी  भांडण  केले. त्या  सतत  भांडत  असतात. त्यामुळे  बंगालचं  भलं होणार का ?  असा  प्रश्न देखील  त्यांनी उपस्थित  केला.

 

संबंधित बातम्या