Children's Day: 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात? वाचा एका क्लिकवर इतिहास

Children's Day: भारतातमध्येच बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो.
Children's Day | Jawaharlal Nehru
Children's Day | Jawaharlal NehruDainik Gomantak

Children’s Day: वर्षभरातील 365 दिवस बघायला गेले तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच…त्यापैकीच आजचा दिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात इतर देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला बालदिन हा दिवस साजरा करण्यात येतो. मात्र देशभरात बालदिन हा दिवस दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

केवळ भारतातमध्येच बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. पण तुम्हाला यामागचा इतिहास माहित आहे का..? चला तर मग जाणून घेऊया 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात?

Children's Day | Jawaharlal Nehru
Tejasvi Surya: खासदार सूर्या यांची 'तेजस्वी' कामगिरी; पूर्ण केली आव्हानात्मक 'आर्यमॅन' स्पर्धा

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु ( Jawaharlal Nehru) यांची आज जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज येथे जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरुंजीचे जीव की प्राण होते. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे.

पंडित जवाहरलाल नेहरुंना मुलांबद्दल खूप आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा होता. लहान मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्ताने भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यामुळे आजचा हा दिवस देशातील सर्व बालगोपालांना समर्पित आहे.

जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1856 मघ्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्याकाळी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक स्पेशल दिवस ठेवण्यात आला होता. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खास गोष्टी, वेगवेगळे खेळ आयोजित करुन त्यांचा हा खास दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

Children's Day | Jawaharlal Nehru
Earthquake: अमृतसरसह पंजाबच्या काही भागात भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता

तसेच, 1950 मध्ये वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं (Women's International Federation) 1 जून रोजी बालदिन साजरा करण्यासाठी बंदी आणली होती. 1 जूनच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही तारखेला बालदिन साजरा करण्यात यावा, असं वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं म्हणने होते.

कारण तेव्हा 1 जून चा दिवस बाल संरक्षण दिन (Children’s Protection Day) म्हणून साजरा करण्यात येत होता. त्यानंतर 1954 साली संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून घोषित केला होता. त्यानंतर जगात सर्व देशांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली होती.

मात्र भारतात 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर बालदिनाची तारिख बदलून त्यांना आदरांजली म्हणून 14 नोव्हेंबरचा दिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. म्हणूनच हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्ताने भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यांनी आपल्या विकासकार्यात बाल कल्याण उपक्रमांना मोठं प्राधान्य दिलं होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com