Rubber Girl Anvi: 75 टक्के बौद्धिक अपंगत्व असलेली रबर गर्ल अन्वी भेटली पंतप्रधान मोदींना

Rubber Girl Anvi: 75 टक्के बौद्धिक अपंगत्व असलेली रबर गर्ल अन्वी भेटली पंतप्रधान मोदींना

उत्तम शारिरिक लवचिकता असलेली आणि योगासनामुळे प्रसिद्ध झालेली अन्वी झांझारूकिया हिची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. डाऊन सिंड्रोम ग्रस्त असलेली अन्वी हिची रबर गर्ल अशीही ओळख आहे. अन्वीला 75 टक्के बौद्धिक अपंगत्व आहे. या सगळ्यावर मात करून अन्वी योगासनातील एक प्रसिद्ध नाव झाले आहे. भारत सरकारने तिचा राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

अन्वी झांझारूकिया आज आपले आई-वडिल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अन्वी पहिल्यांदाच पंतप्रधानाच्या भेटीला पोहचली. शारिरिक आणि मानसिक अपूर्णता असताना देखील अन्वीने आपल्या समस्यांवर मात करून, वेगळी ओळख निर्माण केली आहे. अन्वी सामान्य माणसाला अशक्य असे अनेक योगा प्रकार अगदी सहज करते. तिचे शरिर एखाद्या रबरासारखे लवचिक आहे. यातूनच तिची रबर गर्ल अशी ओळख निर्माण झाली आहे.

Rubber Girl Anvi: 75 टक्के बौद्धिक अपंगत्व असलेली रबर गर्ल अन्वी भेटली पंतप्रधान मोदींना
गोविंद पेर्नूलकर यांनी घरगूती गणेशोत्सवातून दिला देशभक्तीचा संदेश

'आम्ही सर्व आशा सोडल्या होत्या त्यानंतर अन्वीची लवचिकता आमच्या लक्षात येऊ लागली. योगाने तिला नवे आयुष्य दिले. आमच्यासाठी हे स्वप्नवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हे तिच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर तिने योगासने सादर केली.' असे अन्वीचे वडिल विजय झांझारूकिया म्हणाले.

'योगा एक वरदान आहे. अन्वी दररोज एक तास सकाळी आणि सायंकाळी योगाभ्यास करते. अनेक स्पर्धांमधून तिने इतर मुलांसोबत योगासने सादर करून बक्षिसे जिंकली आहेत.' असे अन्वीची आई अवनी झांझारूकिया म्हणाल्या.

Rubber Girl Anvi: 75 टक्के बौद्धिक अपंगत्व असलेली रबर गर्ल अन्वी भेटली पंतप्रधान मोदींना
मुंडवेल, वास्को येथील कदंब बस स्थानक समस्यांच्या गर्तेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com