Governement Jobs: सरकारने विविध रोजगार मेळाव्यातून दिल्या 1.47 लाख नोकऱ्या; मंत्र्यांची राज्यसभेत माहिती

या पदभरतीत प्राध्यापक, कर निरीक्षक, मल्टी टास्किंग स्टाफचाही समावेश
Jitendra Singh
Jitendra SinghDainik Gomantak

Governement Jobs: नोकरी हवी असणाऱ्यांना नोकरी देणाऱ्यांपर्यंत वेगाने पोहचविण्यासाठी सरकारने रोजगार मेळाव्यांची नीती स्विकारली आहे. अशा रोजगार मेळाव्यांमधून 1.47 लाख रोजगार दिले गेले आहेत. त्यात प्राध्यापक, कर निरीक्षक, मल्टी टास्किग कर्मचारी यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत लिखित उत्तरातून दिली.

Jitendra Singh
Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'हॉस्टेल जेल नाही...'

मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, "देशभरात रोजगार मेळा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि आतापर्यंत विविध केंद्रीय मंत्रालये/विभाग/केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू)/ स्वायत्त संस्था/ सार्वजनिक क्षेत्रातील बँका इत्यादींद्वारे सुमारे 1.47 लाख नवीन नियुक्ती करण्यात आल्या आहेत."

कॉन्स्टेबल, शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे, उपनिरीक्षक, निम्न विभागीय लिपिक, लघुलेखक, वैयक्तिक सहाय्यक, आयकर निरीक्षक, ग्रामीण डाक सेवक, मल्टी टास्किंग कर्मचारी इ. लोकांचाही या रोजगार मेळाव्यात समावेश होता, अशी माहिती मंत्र्यांनी उत्तरात दिली आहे.

Jitendra Singh
Shraddha Walker Case: आरोपी आफताबने जामीन अर्ज घेतला मागे, जाणून घ्या कारण

"रिक्त पदांवर भरती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विभागाकडून नोंदवलेल्या रिक्त जागा भरल्या जातात तेव्हा काही नवीन जागा निर्माण होता. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, पदोन्नती इत्यादींमुळे जागा रिक्त होत असतात, असेही उत्तरात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रालये/विभाग/केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू)/स्वायत्त संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील बँका इत्यादी, थेट किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि कर्मचारी निवड आयोग इत्यादी भरती एजन्सीद्वारे पदभरती केली जाते. ही रिक्त पदे वेळोवेळी भरली जावीत, असे मंत्री म्हणाले. दरम्यान, आणखी एका उत्तरात सिंह म्हणाले की, रोजगार मेळा पुढील रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीमध्ये प्रोत्साहन देऊ शकतो. त्याचा लाभ तरूणांना होईल. त्यातून तरूणांना रोजगार संधीही मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com