ऑक्टोबर महिन्यात बँका १५ दिवस बंद राहणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँका रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बंद असतात. ऑक्टोबर महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आल्याने या महिन्यात जवळपास 15 दिवस सुट्टी असेल. जर तुम्हाला बँकेत जाऊन कोणत्याही बँकिंग कामाची विल्हेवाट लावायची असेल तर त्या दिवशी बँकेची सुट्टी नाही हे आपल्याला माहीत असले पाहिजे.​

नवी दिल्ली: या वर्षातील ऑक्टोबर महिना मोठा सणासुदीचा आहे. त्यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्या असणार आहेत. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यांत 15 दिवस बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँका रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बंद असतात. ऑक्टोबर महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आल्याने या महिन्यात जवळपास 15 दिवस सुट्टी असेल. जर तुम्हाला बँकेत जाऊन कोणत्याही बँकिंग कामाची विल्हेवाट लावायची असेल तर त्या दिवशी बँकेची सुट्टी नाही हे आपल्याला माहीत असले पाहिजे.

2 - महात्मा गांधी जयंतीमुळे देशभरात बँकांना सुट्ट्या असतील.

4- रविवार ही बँकांची साप्ताहिक सुट्टी असेल.

10 - महिन्याचा दुसरा शनिवार सुट्टीचा असेल.

11 - रविवार

17 -  राज्यातील सणांमुळे आसाम आणि मणिपूरमधील बँका बंद राहतील.

18 - रविवार

23 - दुर्गा महासप्तमी (या दिवशी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि मेघालयात बँका बंद राहतील)

24 - दुर्गा महामाष्टमी तसेच चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

25- रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

26 - विजया दशमीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

27,28- दुर्गापुजेमुळे सिक्कीममध्ये बॅंकाना सुट्टी असेल. 

29 - पैगंबर मोहम्मद जयंती आणि दुर्गापूजेमुळे सिक्कीम, जम्मू, कोची, काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.

30 -  ईद-ए-मिलादचा सण आहे ( त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, इम्फाळ, जम्मू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि काश्मीर येथे बँका बंद राहतील)

31- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि शिमला येथील बँका बंद राहणार आहेत)

संबंधित बातम्या