येडियुरप्पा सरकारमध्ये 15 आमदार नाराज; हायकमांडकडे तक्रार करण्याच्या तयारीत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

मुख्यमंत्री  येडियुरप्पांना  स्वपक्षातीलच  आमदारांच्या  नाराजीचा सामना  करावा लागत आहे. त्यांच्याच सरकार  विरुध्द बंडखोरीची तयारी करत दिल्लीकडे  तक्रार  करणार  असल्याचं  कळत  आहे.

बंगळूरु:  येडियुरप्पा  सरकारमध्ये  काही  दिवसांपूर्वीच  मंत्रीमंडळाचा  विस्तार  करण्यात आला  होता. आता  मात्र  मुख्यमंत्री  येडियुरप्पांना  स्वपक्षातीलच  आमदारांच्या  नाराजीचा सामना  करावा लागत आहे. त्यांच्याच सरकार  विरुध्द बंडखोरीची तयारी करत दिल्लीकडे  तक्रार  करणार  असल्याचं  कळत  आहे.

हे सगळे आमदार एकमेंकाच्या संपर्कात असून सरकार  निष्ठावंतांची  गळचेपी  करत  असून  वरिष्ठ  मंत्र्यांना मंत्री  पदावरुन  हटवून  नवीन चेहऱ्यांना संधी  द्यावी जे  येणाऱ्या  काळात  पक्षासाठी प्रभावी  रणणिती  आखतील,असे या आमदारांचे मत आहे.

भाजपचे  आमदार  शिवानगौडा  नायक  म्हणाले  की, "वरिष्ठ  मंत्र्यांनी  पक्षाच्या  कामात हातभार लावावा आणि 2023 मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीची रणनिती आखावी .दरम्यान  मंत्रीमंडळात  समाविष्ट  करण्यात  आलेल्या  मंत्र्यांना  गुरुवारी  खाते वाटप करण्यात  येणार  आहेत. मुख्यमंत्री  येडियुरप्पा  आधीच  म्हणाले  आहेत  की,  ज्या  काही  आमदारांना  मत्रिमंडळ  विस्ताराबाबत अडचणी आहेत त्यांनी थेट हायकमांडशी  बोलावे,  परंतु   जाहीरपणे  विधाने  करु  नयेत'.

 

संबंधित बातम्या