राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांचे 15 हजार चेक झाले बाऊन्स!

राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांचे 15 हजार चेक झाले बाऊन्स!
15000 checks bounced for donations for Ram Mandir

आयोध्या: राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणगीची मोहीम राबवण्यात आली होती. देशभरातील लाखो राम भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरुपात, तर काहींनी ऑनलाईन ट्रान्सफरच्या रुपामध्ये तर काहींनी चेकच्या स्वरुपामध्ये देणग्या दिल्या. मात्र देणग्यांच्या या चेकपैकी विश्व हिंदू परिषदेने गोळा केलेले सुमारे 15 चेक बाऊन्स झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रच्या ऑडिट रिपोर्टमधून ही धक्कादायक बाब समोर आली असून संबंधित देणगीदारांना पुन्हा एकदा देणगी देण्याचे आवाहान ट्रस्टकडून करण्यात आले आहे. दरम्यान यामधील काही चेक खात्यांमध्ये पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणामुळे बाऊन्स झाले आहेत. तर अनेक चेक तांत्रिक अडचणीमुळे बाद करण्यात आले आहेत. (15000 checks bounced for donations for Ram Mandir)

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आयोध्येतील राम मंदिर वादावर देशातील सुप्रीम न्यायालयाने निर्णय दिला आणि हा वाद मिटला होता. वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसेच, आयोध्ये मध्येच मोक्याच्या ठिकाणी मशिदीसाठी देखील पाच एकर जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. मंदिर उभारणीसाठी राम जन्मभूमी ट्रस्ट स्थापन करण्यात आले होते. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहिम राबवण्यात आली होती. मात्र त्यातले 22 कोटी रुपयांचे एकूण 15 हजार चेक बाउन्स झाले आहेत. शिवाय यामधील 2 हजार चेक खुद्द आयोध्येमधलीच देणगीदारांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com