Omicron चा भडका एकाच दिवसात देशात 18 रुग्ण, केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइंस

देशातील 5 राज्यांमध्ये या नवीन प्रकाराच्या एकूण 22 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
18 cases found of corona omicron variant in India
18 cases found of corona omicron variant in India Dainik Gomantak

देशात काल एका दिवसात ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या (COVID-19) नवीन व्हेरिएन्टचे 18 रुग्ण आढळले आहेत. आणि ही बाब साऱ्या देशाला चिंतेत टाकणारी आहे. तापर्यंत, देशातील 5 राज्यांमध्ये या नवीन प्रकाराच्या एकूण 22 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. राजस्थान (Rajasthan), महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक. यापैकी राजस्थानमध्ये 9 आणि महाराष्ट्रात (Maharashtra Omicron) 9 रुग्ण आढळले असून राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 4 लोकांना या नवीन प्रकाराची लागण झाली आहे. (18 cases found of corona omicron variant in India)

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील 4 सदस्य नुकतेच आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 5 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. जीनोम सिक्वेन्सिंगनंतर, रविवारी या 9 लोकांमध्ये ओमिक्रॉन प्रकाराची पुष्टी झाली आहे. तर कालच पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील 7 लोकांना याची लागण झाली आहे.

25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील संक्रमित कुटुंबातील 4 सदस्य दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि मुंबईमार्गे जयपूरला पोहोचले होते. येथे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. या कुटुंबावर राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे दुबई आणि मुंबईतही या कुटुंबाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता यानंतर ते कुटुंब जयपूरला पोहोचले आणि 28 नोव्हेंबरला जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये एका लग्नसोहळ्यात देखील सहभागी झाले होते.

18 cases found of corona omicron variant in India
Omicron ची लक्षणे वेगळी आहेत, जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर?

तर दुसरीकडे महाराष्ट्रात एकाच दिवशी ओमिक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रात प्रशासन हाय अलर्टवर आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 7 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार निश्चित झाले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथे एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. आळंदीच्या व्यक्तीचे नमुने पुन्हा जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल सोमवारी येईल, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनची लागण झालेल्या 7 जणांपैकी 4 जण नुकतेच परदेशातून परतले होते. या सर्वांची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 3 जणांचीही चाचणी करण्यात आली असून ते तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्याचा अहवाल रविवारी आला.

18 cases found of corona omicron variant in India
महाराष्ट्रात ओमायक्रॉनमुळे टेन्शन वाढले, सात जणांना लागण

केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन्स

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व लागू करण्यात आली आहेत . केंद्राने 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार आहे. सर्व विमानतळांवर अतिरिक्त RT-PCR सुविधेची व्यवस्था देखील केली जाणार आहे. 'जोखमीचे' देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. ज्या देशांना ओमिक्रॉनच्या धोक्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे, तिथून येणाऱ्या प्रवाशांपैकी 50% प्रवाशांची निश्चितपणे चाचणी केली जाईल. यानुसार, आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हवाई सुविधा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या स्व-घोषणा फॉर्ममध्ये फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 14 दिवसांचा प्रवास इतिहास द्यावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com