कर्नाटकात पूरजन्य परिस्थिती, पाणी साचले, झाडं पडली, उड्डाणे वळवली, 2 मजूर मृतावस्थेत आढळले

आज केरळ कर्नाटकसह, दिल्ली, सिक्कीम, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमालय, कोकणात आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता
Karnataka Rain Updates
Karnataka Rain UpdatesANI

उन्हाच्या झळा सोसणाऱ्या दिल्लीला कालपासून दिलासा मिळाला आहे. आज राजधानीत ढगाळ वातावरण आहे आणि हलके वारे वाहत आहेत, त्यामुळे आज दिल्ली आणि त्याच्या लगतच्या भागात वादळ आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असला तरी आज कमाल तापमान 41 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाला असून, त्याचा प्रभाव आज आणि उद्या कायम राहण्याचा अंदाज आहे.

केरळ-कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस

केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. कर्नाटकात काल संध्याकाळपासून भगवान इंद्राची कृपा दिसत आहे पण मान्सूनच्या सुरवातीलाच लोकांचे हाल व्हायला लागले आहे. पुरजन्य परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राजधानी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. IMD ने आज पुन्हा या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. परिणामी आज उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो, तर राजस्थान, गुजरातमध्ये उष्ण वारे वाहतील, या दोन्ही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Karnataka Rain Updates
Photo: उन्हाळ्यात जम्मू आणि काश्मीरमधील पार्कमध्ये हरिणांसाठी खास सुविधा

राज्यात झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली, मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमधील एका जलमय अंडरपासवर ऑटो-रिक्षा अडकली ज्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये तीव्र पाणी साचले आहे आणि, बंगळुरूमधील मल्लेश्वरम आणि वसंत नगर परिसरातील नागरिकांचा मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद झाला आहे.

दरम्यान, उल्लाल उपनगर उपकार लेआउट बसस्थानकाजवळ काल रात्री मुसळधार पावसामुळे पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशातील 2 मजूर मृतावस्थेत आढळले. 3 जण घटनास्थळी दाखल उपस्शित होते मात्र त्यापैकी एकाचा जीव वाचला आणि घटनास्थळावरून 2 मृतदेह काढण्यात आल्याची माहिती पश्चिम बेंगळुरूचे डीसीपी संजीव पाटील यांनी दिली.

Karnataka Rain Updates
आसाममध्ये पुराने केला विध्वंस; 7 जणांचा मृत्यू 24 जिल्ह्यांना फटका

या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला

मान्सून अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागराच्या जवळ आहे आणि योग्य दिशेने आणि वेगाने पुढे जात आहे, तो 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल, ही आनंदाची बाब आहे. त्याचवेळी आज केरळसह किनारी कर्नाटक, दक्षिण आतील कर्नाटक, तर दिल्ली, सिक्कीम, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमालय, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि गोव्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com