मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर लखवीला १५ वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जानेवारी 2021

 २००८ साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारझकीउर रेहमान लखवी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.

लाहोर : २००८ साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ (एलईटी) या संघटनेचा प्रमुख झकीउर रेहमान लखवी (वय ६१) याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच दंडही ठोठावण्यात आला.

लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तो २०१५ पासून जामिनावर बाहेर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने ताब्यात घेतलं. घटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली होती. 

संबंधित बातम्या