तीन दिवसात ३ हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; म्हणाला, 'पकडला गेलो नसतो तर कित्येक हत्या केल्या असत्या'

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 5 डिसेंबर 2020

तिघांची हत्या केल्याप्रकरणी गुरूग्राममधील एका 22 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने केलेला गुन्ह्याची कबूली दिली असून पकडला गेलो नसतो तर अजून हत्या केल्या केल्या असत्या, असा धक्कादायक खुलासा केला आहे.

नवी दिल्ली- तिघांची हत्या केल्याप्रकरणी गुरूग्राममधील एका 22 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने केलेला गुन्ह्याची कबूली दिली असून पकडला गेलो नसतो तर अजून हत्या केल्या केल्या असत्या, असा धक्कादायक खुलासा केला आहे. तो बिहार, दिल्ली आणि गुरूग्राममधील किमान 10 हत्यांमध्ये सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.  

तीन दिवस तीन लोकांची हत्या-

24 नोव्हेंबर रोजी रात्री चाकूने वार करत एकाची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याची उकल होत नाही तोच, सेक्टर 40 मध्ये दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर करण्यात आलेले वारही आधीच्या घटनेसारखेच होते. यानंतर परत पुढच्याच दिवशी 26 वर्षांच्या तरूणाचे शिर धडावेगळे केलेल्या अवस्थेत आढळून आले. या तीन घटनांनंतर पाळम विहार येथील गुन्हे शाखेने या तीनही घटना झालेल्या स्थळांजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, यात काहीही आढळून आले नाही.

याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी रात्री एक मृतदेह आढळला होता. ज्याची ओऴख पटण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. ओळख पटल्यानंतर त्याआधी घडलेल्या दोन घटनांबाबतही पोलिसांनी तपास यंत्रणा सज्ज केली. यानंतरही अनेक सीसीटीव्ही कॅमेऱे बघण्यात आले. मात्र, पोलिसांना कोणतेही लीड न मिळाल्याने ही केस गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांच्या तपासातच आरोपी मोहम्मद रजी याला इफको चौकातून अटक केली. तो मुळचा बिहार येथील असून तीनही हत्या त्यानेच केल्याचे त्याने यावेळी कबूल केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आधी एखाद्या व्यक्तीबरोबर मद्य प्राशन करत होता. आणि त्यानंतर त्याची हत्या करत होता. आणि त्यांच्याकडील ऐवज लंपास करत होता. 26नोव्हेंबर रोजी त्याने ज्या व्यक्तीबरोबर मद्य प्राशन केले होते त्याचे शीरसावंद्य त्याने धडावेगळे केले आणि ते त्याने कन्हाई गावाच्या झोपड्यांजवळ फेकून दिले. त्याने हत्या केलेल्या तीनही व्यक्ती गरीब होत्या. या तीनही घटनांमधील साम्य शोधत पोलिसांनी घटनेचा तपास केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रजी याला ताब्यात घेतले. 

सापडलो नसतो तर अजून कित्येक जीव घेतले असते- 

आरोपी मोहम्मद रजी हा मुळचा बिहार येथील असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र, काही दिवसांपासून त्याचे काम गेले होते. तो लोकांना दारू पाजून त्यांच्याकडील ऐवज लुटून नेत होता. प्रसंगी लोकांचे जीवही घेत होता. त्याला गावाकडील सर्व जण लहानपणापासून दुबळा समजत असल्याने त्याने अशा प्रकारच्या हत्या करून सर्वांना दाखवून देण्याचा निर्धार केला. आणि त्यातच त्याने तीन गंभीर गुन्हेही केले. पोलिसांच्या जाळ्यात अडकलो नसतो तर अजून भरपूर हत्या केल्या असत्या अशी धक्कादायक कबूलीही त्याने यावेळी पोलिसांना दिली. 

   

 

संबंधित बातम्या