रेल्वेच्या 68,800 डब्यांमध्ये 2,45,400 जैविक शौचालये

indian railway have good facility
indian railway have good facility

नवी दिल्ली, 

जगातील सर्वोत्तम रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. स्वच्छ रेल्वे उपक्रम हाती घेऊन, स्वच्छ पर्यावरण आणि सहज प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देण्यासाठी, भारतीय रेल्वेने स्वच्छ भारत अंतर्गत विविध पावले उचलली आहेत.

काही महत्त्वपूर्ण बाबी खाली सूचिबद्ध आहेत-

  • 2019 – 20 या काळात 49,487 जैविक शौचालय 14,916 कोचेसमध्ये बसविण्यात आली आहेत. अशाप्रकारे एकूण  2,45,400 पेक्षा अधिक जैविक शौचालये 68,800 कोचेसमध्ये बसविण्यात आली आहेत, जी 100 % हून अधिक आहेत.
  • 2 ऑक्टोबर 2019 च्या150 व्या गांधी जयंतीपासून प्लॅस्टिकच्या एकाही वस्तूचा वापर नाही
  • 2019-20 मध्ये आयएसओ : 14001 पर्यावरण व्यवस्थापन कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीसाठी 200 रेल्वे स्थानके प्रमाणित आहेत.
  • आता 953 स्थानकांवर एकात्मिक यांत्रिकीकृत साफ सफाई करण्यात आली आहे.
  • स्वच्छतेच्या मानदंडांबाबत प्रवाशांच्या मते जाणून घेण्यासाठी 2019-20 मध्ये 720 स्थानकांवर आम्ही त्रयस्थपणे सर्वेक्षण केले.
  • राजधानी, शताब्दी, दुरान्तो आणि अन्य महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मेल / एक्स्प्रेस यांसह सुमारे 1100 जोडी असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता सेवा सुविधा (ओबीएचएस) उपलब्ध आहे. जी प्रवासी डब्यांची स्वच्छता, स्वच्छतागृह, दरवाजे, येण्या-जाण्याची मधली रिकामी जागा यांची स्वच्छता प्रवासादरम्यानच करत असते.
  • ओबीएचएस सेवा ही एसएमएस सुविधेवर अवलंबून आहे. सुमारे 1060 जोडीच्या गाड्यांना ‘कोच मित्र’सेवेअंतर्गत ही सेवा मागणीनुसार पुरविली जाते.
  • वातानुकूलित डब्याच्या प्रवाशांना पुरविलेल्या ताग्याचे, कपडे धुण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने चालणारी लॉन्ड्री उभारण्यात येत आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात 8 यांत्रिकी पद्धतीने चालणाऱ्या लॉन्ड्री स्थापित करण्यात आल्या आहेत. (एकूण 68)
  • प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करणे, पुनर्वापर करणे आणि   प्लास्टिक नष्ट    करणे या पद्धतीने स्थानकांवर जमा झालेला प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणपूरक पद्धतीने, तसेच झोनल रेल्वेने प्लॅस्टिक बाटल्यांसाठी क्रशिंग मीशन (पीबीसीएम) बसविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. सध्या भारतीय रेल्वेवरील अनेक जिल्हा मुख्यालय रेल्वे स्थानकांसह 229 स्थानकांवर सुमारे 315 पीबीसीएम बसविण्यात आल्या आहेत. 
  • 2019-20 मध्ये 81 ठिकाणी स्वयंचलित डबे धुण्याची यंत्रणा (एसीडब्ल्यूपी) स्थापित करण्यात आली आहे. (एकूण 20).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com