बेंगळुरूमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीत 25 वर्षीय महिलेला अटक

25-year-old woman arrested for drug peddling in Bangalore
25-year-old woman arrested for drug peddling in Bangalore

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू (Bangalore) येथे एका 25 वर्षीय महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या (Drug Peddling) आरोपाखाली पकडण्यात आले आहे. सुलभ आणि लवकर पैसे कमविण्याच्या नादात आपल्या प्रियकरासोबत तिने गांजाचा व्यवसाय (Ganja Business) सुरू केला. यासाठी तिने आपली चेन्नईतील नोकरी देखील सोडली. रेणुका आर उर्फ अध्या (रा. आंध्रप्रदेश) आणि सुधांशु सिंह (रा. बिहार) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तिचा प्रियकर सिध्दार्थ हा बंगळुरूमधील मॅनेजमेंट महाविद्यालयात शिकायला होता. तो समद्या फरार आहे. (25-year-old woman arrested for drug peddling in Bangalore)

रेणुका आणि सिध्दार्थ दोघे कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान, सिध्दार्थ ड्रग पेडलर बनला तर रेणुका एका खसगी कंपनीत नोकरी करत होती. परंतु रेणुका तिला मिळणाऱ्या पगारावर खूश नव्हती. म्हणून सिध्दार्थने तिला गांजा व्यवसायात सामील होऊन कुटुंबासाठी पुरेसे पैसे कमविण्यास सांगितले. एप्रिलमध्ये रेणुकाने मराठागल्लीत हॉटेल बुक केले त्यावेळी सिध्दार्थ आणि त्याचा साथीदार गोपाळ यांनी विशाखापट्टणमच्या माध्यमातून ओडिसाहून गांजा मिळवला. कोरोना महामारीमुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने गांजाला मागणी वाढणार हे सिध्दार्थला माहिती होते. तसेच शहरात देखील गांज्याची कमतरता भासत होती. यावेळी त्याने सुधांशुला आपल्या मैत्रिणीसोबत गांज्याची विक्री करण्यास सांगितले.

६ जूनच्या सुमारास शहरातील आयटी पार्क जवळील गांज्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकत रेणुकाला ताब्यात घेत तिच्याकडून त्यांनी २,५०० ग्रॅम गांजाची १० एकूण १० पाकिटे आणि ६ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले. याबाबत अधिक तपास पोलीस करत असून, सिध्दार्थ आणि गोपाळ यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com