इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या आव्हानानंतर ट्विटरवरील 250 खाती बंद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

प्रजासत्ताक दिनादिवशी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसक घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (एमईईटी) सोशल मीडियावरील ट्विटरला सुमारे 250 खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रजासत्ताक दिनादिवशी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसक घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (एमईईटी) सोशल मीडियावरील ट्विटरला सुमारे 250 खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. व  ट्विटरने देखील ही खाती ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. खोटी, चिथावणी आणि हिंसक घटनांसाठी ट्विट करून वातावरण बिघडवल्याचा आरोप या खात्यांवर ठेवण्यात आला आहे. 

गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडियाच्या ट्विटरवरील 250 खाती बंद करण्याचे निर्देश ट्विटरला दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला केलेल्या निवेदनात, काही ट्विटर अकाउंट्स शेतकऱ्यांच्या आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवत असून, त्यांच्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर शेतकरी आंदोलनाच्या वेळेस या ट्विटर अकाउंट्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून निशाणा साधण्यात आला होता. 

Union Budget2021 : सेन्सेक्स तब्बल 2314 आणि निफ्टी 646 अंकांनी झेपावला  

त्यामुळे, गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या निर्देशानंतर सरकारने काही ट्विटर खात्यांवर कारवाई करण्याचे आव्हान ट्विटरला केले आहे. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार 30 जानेवारीला या ट्विटर खात्यांवरून खोटे आणि चिथावणी देणारे ट्विट करण्यात आले होते. तर यापूर्वी प्रजासत्ताक दिनादिवशीच्या ट्रॅक्टर परेडच्या अगोदर 350 हून अधिक ट्विटर खात्यांवर आपली नजर असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले होते. शिवाय या खात्यांचा वापर करून ट्रॅक्टर मोर्चाच्या दिवशी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते.       

त्यानंतर आता, किसान एकता मोर्चा, द कारवां, माणिक गोयल, आपचे पंजाब प्रमुख जर्नेल सिंह, अजित रानडे, मानव जीवन, ट्रॅक्टर टू ट्विटर आणि जट_जंक्शन अशा खात्यांवर कारवाई करत ही खाती बंद करण्यात आली आहेत. तर यापूर्वी, केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या विरोधात ट्विटरवरून करण्यात येत असलेल्या ट्विट्स संदर्भात ट्विटरला नोटीस पाठविली होती. त्यानंतर आता या खात्यांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आल्याचे समजते. 

संबंधित बातम्या