Odisha: नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत CRPF चे 3 जवान शहीद

ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यात मंगळवारी एका सुरक्षा चौकीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तीन जवान शहीद झाले.
Odisha: नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत CRPF चे 3 जवान शहीद
CRPFDainik Gomantak

ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यात मंगळवारी एका सुरक्षा चौकीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तीन जवान शहीद झाले. ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या माहितीचा हवाला देताना सांगितले की, नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सच्या सहाय्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) टीमवर हल्ला केला.

CRPF
Odisha: जाजपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील 9 मुलींना कोरोनाची लागण

तसेच, नुआपाडा जिल्ह्यातील सहजप गावाजवळ दुपारी 2.30 च्या सुमारास हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी उद्धृत केली. रस्ता उघडण्याच्या कामात गुंतलेल्या टीमवर नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचरने हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल नक्षलवादी पळून गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com