राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, 3 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; 'हे' पक्ष फुटले

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात भाजपची मतांची ताकद वाढली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, 3 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; 'हे' पक्ष फुटले
Shivraj Singh ChouhanDainik Gomantak

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी मंगळवारी मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राजकीय खळबळ उडत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातील भाजपसमर्थित (BJP) मतदारांची संख्या वाढवण्यासाठी भाजपने मोठा डाव खेळला. छतरपूर जिल्ह्यातील बिजावार विधानसभा मतदारसंघातील सपा आमदार राजेश कुमार शुक्ला, भिंडमधील बसपाचे आमदार संजीव सिंह कुशवाह आणि अपक्ष आमदार राणा विक्रम सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपचा मोठा विजय मानला जात आहे. (3 MLAs join BJP before presidential election)

Shivraj Singh Chouhan
गौतम अदानींची मोठी डील: फ्रेंच ऊर्जा कंपनी करणार अदानी समूहात गुंतवणूक

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना बुधवारी जारी होणार आहे. तीन आमदार भाजपमध्ये सामील होताच, मध्य प्रदेशातील भाजप समर्थित मतांचे मूल्य राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वाढेल आणि ही संख्या 262 वर जाईल.

या प्रसंगी आमदार संजीव कुशवाह म्हणाल की, मी हरवलो होतो, आता कुटुंबात आल्याचा आनंद झाल्याचे सांगितले आहे. प्रदेशाच्या विकासासाठी मी या पक्षामध्ये आलो आहे. आमदार राजेश शुक्ला म्हणाले की, 2018 मध्ये मला भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा होती.

बुंदेलखंड मागासलेला आहे, त्यामुळेच पक्षाच्या विकासासाठी मी पक्षात आलो. पक्षात कोणीही असमाधानी नाहीये. राणा विक्रम सिंह म्हणाले की, 2018 मध्ये अपक्ष म्हणून जिंकूनही त्यांना भाजपमध्ये जावे लागले होते आणि कमलनाथ 15 महिने सरकारसोबत राहिले होते. तसेच भाजप सरकारमध्ये खूप विकास झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com