पाकिस्तानी सीमा ओलांडून चिमुकल्याने केल भारतीय हद्दीत प्रवेश, BSFने दाखवले औदार्य

बीएसएफच्या सुरक्षित संरक्षणात या बालकाला ठेवण्यात आले. बीएसएफने पाक रेंजर्सशी साधला संपर्क
BSF
BSFDainik Gomantak

चंदीगड: पाकिस्तानकडून भारतीय सीमेत घुसखोरी होत असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. कोणत्याही दहशतवाद्याने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे मनसुबे उधळून लावता यावेत यासाठी भारतीय सीमेवरील सुरक्षा दल काळजीपूर्वक लक्ष ठेवतात. दरम्यान, शनिवारी एक निष्पाप बालक भारतीय हद्दीत घुसल्याने बीएसएफच्या (BSF) जवानांनी कारवाई करत त्याला पकडले. (3-year old boy crosses Pakistani border enters Indian border BSF)

मात्र, या मुलाला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती देताना बीएसएफने शनिवारी सांगितले की, पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये एका मुलाने पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. हे बालक 3 वर्षांचे असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले.

BSF
भारतीय लष्कर आणि नौदलाची अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू

"बॉर्डर पार करून आलेल्या मुलाला काहीही सांगता आले नाही, तो सतत रडत होता, त्याला बीएसएफच्या सुरक्षित संरक्षणात ठेवण्यात आले. मूल रडत होते आणि पप्पा-पप्पा म्हणत होते. हे अनावधानाने भटकण्याचे प्रकरण असल्याने, बीएसएफने पाक रेंजर्स सोबत संपर्क साधला आणि त्यांना ताबडतोब फ्लॅग मीटिंग घेण्यास सांगण्यात आले. त्या नंतर मुलाच्या वडिलांना कळवण्यात आले. आणि भारतीय जवानंच्या आणि वडिलांच्या उपस्थितीत मुलाला पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले," असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

BSF
Udaipur Murder Case: कन्हैया लाल हत्येतील आरोपींची NIA कोठडी रवानगी

सद्भावना आणि मानवतावादी आधारावर या मुलाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवण्यात आले. हे मुल अजाणतेपणी भरकटले आहे, आणि त्यांच्यासोबत बीएसएफ नेहमीच मानवी भूमिका घेते, असे बीएसएफने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com