
देशात अनेक वेळा महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावरुन देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र अशा घटना थांबण्यास तयार नाहीत. अशीच धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात कोलकत्ता येथे घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेवर वरिष्ठ सहकाऱ्यांनी बलात्कार केला असल्याची घटना समोर आली आहे. (30 year old woman gang raped by senior colleagues during party )
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात कोलकत्ता येथे 30 वर्षीय बीपीओ एक्झिक्युटिव्हवर महिला एका गेस्ट हाऊसमधील ऑफिस पार्टीच्या निमित्ताने आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्र आली होती. यावेळी पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरुन तिच्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी - दोन पुरुष आणि एक महिला - कथितपणे काही पेय पिण्यात दिली होती. या नंतर ती बेशुद्ध झाली असता तीच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार संशयित भास्कर बॅनर्जी, चिरंजीब सूत्रधर आणि इंद्राणी दास या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोलकत्ता येथील चिनार पार्कमधील एका इमारतीचा सहावा मजला बीपीओने शनिवारच्या पार्टीसाठी बुक केला होता. नियोजनानुसार शनिवारी पार्टी सुरू झाल्याानंतर थोड्याच वेळात इंद्राणी दास पीडितेला एका खोलीत घेऊन गेला - जिथे सूत्रधार आणि बॅनर्जी उपस्थित होते. "त्यांनी पीडितेसोबत चर्चा करताना मद्यपान करण्यास सुरुवात केली.
मद्यपान सुरु केल्या नंतर थोड्याच वेळात पीडित महिलेची शुद्ध हरपली आणि यानंतरचे तिला काही आठवत नाही. असे तिने सांगितले. मात्र जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती नग्न अवस्थेत बेडवर एकटी पडली होती. यानंतर पीडितेने तिच्या सहकाऱ्यांना बोलावले. आणि याबद्दल विचारले असता ती झोपली होती म्हणून ते निघून गेल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले. पण या उत्तरांनी पिडितेचे समाधान न झाल्याने तिने बुधवारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पीडितेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. व तासाभरातच आरोपींना कार्यालयातून पोलीसांनी उचलले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.