Cyclone Tauktae: वादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या 34 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

भारतीय नौदल 'मिशन 707' या मोहिमे अंतर्गत हे बचाव कार्य करत असून, आता पर्यंत अरबी समुद्रातून 184  जणांची सुटका करण्यात आली आहे.

'तौक्ते' (Tauktae) या महाकाय चक्रीवादळ (Cyclone) भारताच्या सागरी सिमेत आल्यानंतर या वादळाने देशातील अनेक राज्यांत मोठा विध्वंस केला आहे. तसेच या वादळामुळे समुद्रात देखील मोठ्या हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तौक्ते या चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात अनेक बार्ज आणि बोटींचे नियंत्रण सुटले असून त्यावरील शेकडो प्रवासी मृत्यूच्या जबड्यात सापडले आहेत. या महाभयंकर संकटाशी लढण्यासाठी भारतीय नौदलाचे (Indian Navy) बचाव कार्य (Rescue Operation) सुरु आहे. त्याअंर्तगत समुद्रात अडकलेल्या अनेक मच्छिमार आणि खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र 34 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहीती मिळाली आहे. (34 people have died after being stranded in the Arabian Sea)

...तर लसींच्या कमरतेचा प्रश्न '20 दिवसात' मार्गी लागेल: नितीन गडकरी

अरबी समुद्रात (Arabian Sea) अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. अनियंत्रित झालेल्या काही बार्ज आणि मच्छिमारांच्या बोटींवरील शेकडो लोक बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. भारतीय नौदल 'मिशन 707' या मोहिमे अंतर्गत हे बचाव कार्य करत असून, आता पर्यंत अरबी समुद्रातून 184  जणांची सुटका करण्यात आली आहे. तर समुद्रात अडकलेल्या 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. तर काही वेळापूर्वी समुद्रातून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

दरम्यान, आयएनएस कोलकाता ही युद्धनौकेत 18 मृतदेह घेऊन थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार आहे. तर आयएनएस कोची मधून 16 मृतदेह आणल्याची माहिती मिळते आहे. हे बचाव कार्य आज पर्यंतचे सगळ्यात मोठे आव्हान असून, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हे बचाव कार्य म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालून बाहेर काढण्यासारखे आहे असे वर्णन केले आहे.   

संबंधित बातम्या