मसुरीतील ३९ 'ट्रेनी अधिकाऱ्यांना' कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ ॲडमिनीस्ट्रेशन (एलबीएसएनएए) येथील  ३३ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अकादमीच्या पाच इमारतींना चौदा दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

नवी दिल्ली  : मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ ॲडमिनीस्ट्रेशन (एलबीएसएनएए) येथील  ३३ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अकादमीच्या पाच इमारतींना चौदा दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. त्याचवेळी दोन दिवसांसाठी अकादमी संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तूर्त प्रशिक्षणार्थी अधिकारी ऑनलाइन अभ्यास करणार आहेत. 

एलबीएस अकादमीत ९५ व्या फाउंडेशन कोर्सला एकूण ४२८ प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. कोविड गाइडलाइनचे अकादमीच्या कॅम्पसमध्ये काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. प्रत्येक पातळीवर खबरदारी घेतली जात असल्याचे एलबीएसएनएए यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अकादमीच्या वस्तीगृहात थांबण्याचे आदेश दिले असून त्यांना खोलीतच जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अकादमीचे संचालक संजीव चोप्रा, डेहराडून जिल्हा प्रशासन आणि उत्तराखंडचा आरोग्य विभाग या स्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. अकादमीत एकाचवेळी एवढ्या संख्येने बाधित अधिकारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुढील दोन दिवस अकादमी बंद ठेवली जाणार असून संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला जाणार आहे. अकादमीत कालपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मसुरीचे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार म्हणाले की, अकादमीत पाच कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. त्यात नर्मदा, कावेरी, गोदावरी, हॅपी व्हॅली, व्यू सिल्वर वुड यास कंटेनमेंट झोन म्हणून निश्‍चित केले आहे. बाधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत १५० जणांची चाचणी केली आहे. अकादमीतील सर्वांची चाचणी केली जाणार आहे. 

संबंधित बातम्या