कारवारमध्ये आणखीन चार रुग्ण

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

३१ मेपर्यंत सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यानी संचारबंदीचे पालन करावे. जेणेकरून कोरोना रोग फैलावण्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.

कारवार

कारवार जिल्ह्यातील यल्लापुर, मुंडगोड, होन्नावर आणि जोयडा तालुक्यात प्रत्येकी एक प्रमाणे आणखी चौघे कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्याचे जिल्हाधिकारी डॉ हरीश कुमार के यानी सांगितले. सारे जण परराज्यातून आले असल्याने जिल्ह्यातीलव लोकानी चिंता करण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.
संसर्ग झालेल्या सर्वांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. ३१ मेपर्यंत सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यानी संचारबंदीचे पालन करावे. जेणेकरून कोरोना रोग फैलावण्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. वैद्यकीय कारणाशिवाय  कोणी घराबाहेर पडले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे ई पास असणे गरजेचे आहे. अशा प्रवाशांना प्रथम अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल नंतर त्यांनी घरातच अलगीकरण करून रहावे लागेल. ३१ मेपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असणार आहेत.   ६५ वर्षांवरील ज्येष्ठांनी व १० वर्षांखालील मुलांनी तसेच गरोदर महिलांनी सायंकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत अजिबात घराबाहेर पडू नये, असे ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधिकारी देवराजू म्हणाले, की पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणार आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, भटकळ तालुक्यातील जाली नगरपंचायतीच्या हद्दीतील शेडकुळी होंडा येथे मुखावरण (मास्क)न घालता विटीदांडू खेळणाऱ्या १२ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरतकुमार यांनी टाळेबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित बातम्या