उत्तर प्रदेशमध्ये 'रक्तरंजित' होळी; 4 लोकांचा मृत्यू, तर फतेहपूरमध्ये दगडफेक

प्रयागराजमध्ये भांडणात दोघांचा मृत्यू
Holi Celebration
Holi CelebrationDainik Gomantak

होळीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दोन पक्षांमध्ये रंग लावण्यावरून वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. दरम्यान, प्रयागराजमध्ये भांडणात दोघांचा मृत्यू झाला, तर संभलमध्ये काहींनी मशिदीवर रंग फेकला. (UP News)

Holi Celebration
Uttar Pradesh: योगी 2.0 सरकारमध्ये 3 उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

फतेहपूरमध्ये दगडफेक
यूपीच्या फतेहपूरमध्ये रंग लावण्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या डीएम, एसपी यांच्या वाहनांवरसंतप्त लोकांनी दगडफेक केली. यात महिला पोलिसांसह अनेक पोलिस (Police) जखमी झाले. त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

अमेठीमध्ये दोन जणांचा मृत्यू
अशाच आणखी एका घटनेत अमेठीच्या बाबूपूर गावात होळीचे (Holi) रंग लावण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. शुक्रवारी जिल्ह्यातील जामो पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवदापूर गावात होळी खेळण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात रक्तरंजित हाणामारी झाली, त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Holi Celebration
योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

प्रयागराजमध्ये मद्यधुंद अवस्थेत दोन गटात भांडण, दोघांचा मृत्यू
प्रयागराजमध्ये शुक्रवारी होळीच्या उत्सवादरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला. पीडितांपैकी एकाला काठीने मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. राहुल सोनकर (25) आणि संजय राजपूत (35) अशी मृतांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की, जॉर्जटाउन पोलिस स्टेशन हद्दीतील दांडिया परिसरात होळी खेळत असताना मद्यधुंद अवस्थेत दोन गटांमध्ये भांडण झाले. गोळी लागल्यानंतर राहुलला रुग्णालयात (Hospital) नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com