छत्तीसगडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात ४ नागरिकांचा मृत्यू

PTI
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

कोरिया जिल्ह्यातील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले. अन्य एक जण बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. ही घटना काल सायंकाळी देवगड जंगल क्षेत्रात घडली.

कोरबा  :   कोरिया जिल्ह्यातील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले. अन्य एक जण बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. ही घटना काल सायंकाळी देवगड जंगल क्षेत्रात घडली. जंगलातून लाकडे गोळा करुन परतणाऱ्या नागरिकांवर अस्वलाने हल्ला केल्याचे वनाधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी काही ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी झाडावर चढले.

 

अंगवाही येथील काही ग्रामस्थ देवगडच्या जंगलात लाकडे आणि वनौषधी गोळा करण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गावाकडे परतताना अस्वलाने ग्रामस्थांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात फूल साय पंडो (वय ६०), रामबाई (वय ६५) आणि अन्य एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच बसंती, सोनामती, कमलाबाई, पीलर आणि बाबीसह अन्य गंभीररित्या जखमी झाले. 

 

बचावासाठी झाडावर चढले

अस्वलाच्या हल्ल्याने भयभीत होऊन झाडावर बसलेल्यापैकी एक युवक तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच अस्वलाने त्याच्यावर झडप घातली आणि ठार केले. तर अन्य दोघांना झाडावरून उतरता आले नाही. यादरम्यान वनविभागाचे पथक पोचल्यानंतर तेथील लोकांना वाचवता आले. तसेच आणखी एक युवक बेपत्ता असून वनविभागाकडून त्याचा तपास सुरू आहे. 

 

 

संबंधित बातम्या

Tags