जम्मू - काश्मीर सीमेवर आढळले ४० मीटर लांबीचे भुयार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

जम्मू - काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ३० ते ४० मीटरचे भुयार आढळून आले आहे. नगरोटा येथे चकमकीत मारले गेलेले दहशतवादी याच भुयाराचा वापर करून भारतात घुसल्याचा दावा करण्यात येत आहे. 

श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ३० ते ४० मीटरचे भुयार आढळून आले आहे. नगरोटा येथे चकमकीत मारले गेलेले दहशतवादी याच भुयाराचा वापर करून भारतात घुसल्याचा दावा करण्यात येत आहे. 

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना गस्त घालत असताना हे भुयार सापडले. बीएसएफचे महानिरीक्षक एनएस जामवार याबाबत म्हणाले, ``आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयार आढळून आले आहे, याचाच अर्थ पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट होते.``

या भुयाराचा वापर करूनच दहशतवादी भारतात घुसले होते. हे भुयार नुकतेच तयार केलेले असावे. दहशतवाद्यांसोबत त्यांचा कोणी गाइड होता का याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असेही जामवार यांनी सांगितले. 
सुरक्षा दलांबरोबर  गेल्या गुरुवारी जम्मूतील नागरोटा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळाही जप्त करण्यात आला होता. 

अधिक वाचा : 

‘न्यूयॉर्क टाइम्सच्या दर्जेदार पुस्तकांच्या यादीत तीन भारतीयांची पुस्तके

आंध्र पाठोपाठ तमिळनाडूतही ऑनलाइन गेमिंगवर  बंदी

 

संबंधित बातम्या