कर्नाटकच्या म्हैसूर बलात्कार प्रकपणात 5 आरोपींना अटक

अटक केलेल्या आरोपींपैकी एक 17 वर्षीय अल्पवयीन असल्याचे समजते आहे.
कर्नाटकच्या म्हैसूर बलात्कार प्रकपणात 5 आरोपींना अटक
Representative ImageDainik Gomantak

म्हैसूर (Mysore) बलात्कार प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka) पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी मजूर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाबाबत कर्नाटकात लोकांमध्ये मोठा आक्रोष असल्याचे पहायला मिळते आहे. त्यामूळे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. एका विद्यार्थिनीवर पैसे न दिल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. यासोबतच विद्यार्थीनीच्या प्रियकरालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील घटनामसुरू येथे घडली.

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांनी शनिवारी सांगितले की, म्हैसूरू सामूहिक बलात्कार प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर सहावा आरोपी फरार असून पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच हे पाचही आरोपी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील मजूर असल्याचे समजते आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी एक 17 वर्षीय अल्पवयीन असल्याचे समजते आहे.कर्नाटकच्या उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही अत्यंत संवेदनशील बाब असुन आमच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे आहेत.

Representative Image
Kabul Bomb Blast शी केरळमधील 14 लोकांचा संबंध, दोन पाकिस्तानी गजाआड- रिपोर्ट

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. तक्रारीमध्ये पीडितेने सांगितले की, शहरातील चामुंडी हिल्स परिसरात काही लोकांनी तिला घेरले आणि पैशांची मागणी केली. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा दोन आरोपींनी मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या प्रियकराला सुद्धा मारहाण केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com