अहमदाबादमध्ये कोविड रुग्णालयात लागलेल्या  आगीत पाचजणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

गुजरातमध्ये राजकोटमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत पाच कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकोटमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत पाच कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत गुजरात सरकारकडून या प्रकरणी अहवाल मागितला आहे. चार मजली उदय शिवानंद रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या रुग्णालयात ३१ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी २६ रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले.

अतिदक्षता विभागातील ११ पैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तिघांनी जागेवरच तर इतर दोघांनी इतरत्र हलवित असताना अखेरचा श्वास घेतला. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुजरात सरकारने आगीची चौकशी करण्यासाठी आएएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

अधिक वाचा :

काल सुधारलेली दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज पुन्हा खराब 

आंदोलक शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाता येऊ नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न

संबंधित बातम्या