Terrorists
TerroristsDainik Gomantak

लष्कर-ए-तैय्यबाच्या पाच दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक, मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि सोपोरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि सोपोरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. अटक केलेल्या पाच संशयितांपैकी दोघांना श्रीनगरमधून तर तिघांना सोपोरमधून अटक करण्यात आली आहे. ते दहशतवाद्यांना दारुगोळा आणि रसद पुरवायचे, अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, हे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखत असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. (5 lashkar e taiba terrorists arrest with weapons in jammu and kashmir)

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि सोपोर भागातून पाच लष्कर-ए-तैय्यबाच्या दहशतवाद्यांना (Terrorists) अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि रसद जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले संशयित दहशतवाद्यांना रसद पुरवायचे. यापैकी दोघांना श्रीनगरमध्ये (Srinagar) तर उर्वरित तिघांना सोपोरपासून 50 किमी अंतरावर अटक करण्यात आली.

Terrorists
काश्मिर पंडितांना लष्कर-ए-इस्लाम संघटनेची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते लष्कर-ए-तैय्यबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित आहेत. विशेष म्हणजे, मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते.

दहशतवादी कोण आहेत

हे दहशतवादी असे आहेत, ज्यांची सुरक्षा दलांच्या नोंदींमध्ये नोंद नाही. दहशतवादी गटांनी त्यांना फक्त एकदा किंवा दोनदा दहशतवादी हल्ले करण्यासाठी आणले आहे.

Terrorists
पुलवामात दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, लष्कर-ए-तैयबचे सहा मदतनीस गजाआड

दुसरीकडे, शार शाली ख्रु पंपोर येथील नावेद शफी वाणी आणि कडलाबल पंपोर येथील फैजान रशीद तेली अशी पोलिसांनी या दहशतवाद्यांची नावे सांगितली आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैय्यबाच्या दहशतवाद्यांना शस्त्रे, स्फोटके आणि रसद पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्याकडून सहा पिस्तुल मॅगझिन, गोळ्या, एक ग्रेनेड आणि जिलेटिनच्या कांड्या, वायर आणि आठ डिटोनेटर्स जप्त करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com