छत्तीसगडमध्ये सैनिकांच्या बसवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 मार्च 2021

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व सैनिक जिल्हा राखील दलाचे सैनिक असून नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या बसला स्फोटकांनी उडवत हा हल्ला केला आहे.

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व सैनिक जिल्हा राखील दलाचे सैनिक असून नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या बसला स्फोटकांनी उडवत हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 5 सैनिक हुतात्मा झाले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच बॅकअप फोर्स घटनास्थळावर पाठविण्यात आल्याचे समजते. हे सर्व सैनिक एक मोहीम पूर्ण करून परतत असताना हा हल्ला झाला आहे. पोलीस अधिकारी मोहित गर्ग यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. (5 soldiers killed in Naxal attack on army bus in Chhattisgarh)

केंद्राचा मोठा निर्णय; आता 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

पोलीस महासंचालक डीएम अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला छत्तीसगडच्या काडेनर आणि मांडोदा या दरम्यान असलेल्या कान्होर गावाजवळ झाला. या हल्ल्यात तीन जिल्हा राखीव दलाचे सैनिक हुतात्मा झाले तर काहीजण गंभीर जखमी झालेत. हे सैनिक मांडोडाला जात असताना हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसानी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हुतात्मा सैनिकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हुतात्मा झालेल्या 5 सैनिकांपैकी एक ड्रायव्हर आणि 4 सैनिक आहेत. 

''काँग्रेस ही कमकुवत झाली असून त्यांनी घरी बसून चालणार नाही'...

सैनिक बसमधून काडेनरहून मंडोदला जात होते. मात्र रस्त्यातच स्फोटकांनी हल्ला करत नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणला. स्फोटानंतर सैनिकांनी भरलेली बस पुलाखाली कोसळली. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी 17 मार्च रोजी सरकारला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला होता. नक्षलवाद्यांनी जनतेच्या हितासाठी छत्तीसगड सरकारशी बोलणी करण्यास तयार असल्याचे सांगून एक निवेदन जारी केले होते. वाटाघाटीसाठी त्यांनी तीन अटीही घातल्या होत्या. यामध्ये सशस्त्र सेना काढून टाकणे, माओवादी संघटनांवरील निर्बंध हटविणे आणि तुरुंगातील नेत्यांची बिनशर्त मुक्तता या गोष्टींचा समावेश आहे. मात्र अशा हल्ल्यामुळे नक्षलवादी आणि सरकारमध्ये पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या