धक्कादायक! भाजपच्या कार्यालयात सापडले रेमडीसीवीरचे 5 हजार डोस

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

संपूर्ण देशात कोरोनाने  धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या लसींचा तुटवडा भासत आहे.

संपूर्ण देशात कोरोनाने  धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या लसींचा तुटवडा भासत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार रेमडीसीवीर सध्या स्टॉकमध्ये नाही. दरम्यान गुजरातमध्ये भाजपा पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर गुजरातमधील विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.(5000 doses of Remadicivir found in shocking BJP office)

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका वाचा काय म्हणाले

गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात 5 हजार रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना संक्रमित लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. जर रेमडेसिविरचा देशात कुठेच स्टॉक नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडीसीवीर आली कुठून? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

जर रेमडीसीवीर पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राकडे आहे तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर कसं काय मिळू शकतं? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान गुजरातच्या सुरतमधील भाजपच्या मुख्य कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी इथे  लोकांनी सोशल डिंस्टेंसिंगचा फज्जा देखील उडवला.

भारतात कोरोनाचा विस्फोट ;24 तासात 1.52 लाख रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

गुजरातचे भाजप अध्यक्षांनी लोकांना पाच हजार इंजेक्शन मोफत देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा आहे. आता या भाजपच्या नेत्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान देशात सध्या रेमडीसीवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारत सरकारने आता रेमडीसीवीर इंजेक्शन निर्यात बंद केली आहे. रेमडीसीवीर हे औषध कोरोनावरती अतिशय प्रभावी मानले जात आहे. त्यामुळे लोकांची गर्दी  मेडिकल स्टोर तसेच कोविड केअर सेंटर बाहेर दिसत आहे.  

संबंधित बातम्या