पीएम केअर्स अंतर्गत दिले जाणार 50,000 व्हेंटीलेटर

 50,000 ventilators will be provided under PM Care
50,000 ventilators will be provided under PM Care

 नवी दिल्ली,

पीएम केअर्स फंड ट्रस्टने मेड इन इंडियाअर्थात भारतात निर्मित होणाऱ्या 50,000 व्हेंटीलेटरच्या  पुरवठ्यासाठी 2000 कोटी रुपये निर्धारित केले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी कोविड रुग्णालयांना  हे व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार आहेत.तसेच स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी 1000 कोटी रुपये  निर्धारित करण्यात आले आहेत.

50,000 व्हेंटीलेटरपैकी 30,000 व्हेंटीलेटरची भारत इलेक्ट्रोनिक्स मधे निर्मिती करण्यात येत आहे. उर्वरित 20,000 व्हेंटीलेटर पैकी एग्वा हेल्थ केअर 10,000, एएमटीझेड बेसिक 5650, एएमटीझेड हाय एन्ड 4000, अलाईड मेडिकल 350 व्हेंटीलेटर तयार करत आहे. आतापर्यंत 2923 व्हेंटीलेटरची निर्मिती झाली असून त्यापैकी 1340 व्हेंटीलेटरचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 275, दिल्ली 275, गुजरात 175, बिहार 100, कर्नाटक 90, तर राजस्थानला 75 व्हेंटीलेटर पुरवण्यात आले. 2020 जून अखेरपर्यंतआणखी 14,000 व्हेंटीलेटर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येतील.

2011 च्या जनगणनेनुसारच्या  लोकसंख्येसाठी  50% भार,कोविड-19Health  पॉझीटीव्ह प्रकरणांच्या संख्येसाठी 40%  आणि सर्व राज्ये, केंद्र शासित प्र्देशांना समान रूपाने 10 %  या आधारे निधीचे वितरण करण्यात आले आहे. स्थलांतरीतांच्या निवारा, अन्न, वैद्यकीय उपचार आणि प्रवास यासाठी या सहाय्याचा उपयोग कार्याचा आहे. निधी प्राप्त  करणाऱ्या प्रमुख राज्यांमधे महाराष्ट्र 181 कोटी, उत्तर प्रदेश 103 कोटी, तामिळनाडू 83 कोटी, गुजरात 66 कोटी, दिल्ली 55 कोटी, पश्चिम बंगाल 53 कोटी, बिहार 51 कोटी, मध्य प्रदेश 50 कोटी, राजस्थान 50 कोटी आणि कर्नाटक 34 कोटी यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com