पश्चिम बंगालच्या फिश फार्ममधुन 56 जिवंत बॉम्ब जप्त   

दैनिक गोमंतक
सोमवार, 29 मार्च 2021

पश्चिमबंगालच्या अनेक भागात शनिवारपासून पहिल्या टप्प्यातील पाच जिल्ह्यातील 30 मतदारसंघात मतदान झाले. 

पश्चिम बंगाल :  पश्चिमबंगालच्या अनेक भागात शनिवारपासून पहिल्या टप्प्यातील पाच जिल्ह्यातील 30 मतदारसंघात मतदान झाले. आता 1 एप्रिल पासून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होईल. मात्र अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी नरेंद्रपुर भागातील एक घरातून 56 जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरेंद्रपूरातील एका घरात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी हे बॉम्ब जप्त केले आहेत. 

सध्या तरी बॉम्ब पथकाने हे बॉम्ब निष्क्रिय केले आहेत. त्याचबरोबर या बॉम्ब प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांचा शोधही सुरू करण्यात आला आहे. भेरिपूर पोलिस जिल्हा अधीक्षक कमनाशिष सेन यांनी याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी रात्री भेरीपुर येथील फिश फार्ममध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस यंत्रणांनी तातडीने फिश फार्मवर छापा टाकला. यात फिशफार्म मधील घरातून पोलिसांनी 56 जिवंत बॉम्ब जप्त करत निष्क्रिय केले आहेत. तसेच या फार्म मालकवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात सहभागी असलेल्या लोकांचा तपास सुरू केला आहे

Suez Canal Blockage: सुएझमध्ये अडकलेल्या जहाजाची वाट मोकळी; 6 दिवसांनी झाली... 

दरम्यान, मतदानच्या पहिल्याच  दिवशी श्रीरामपूर पुरा आणि दारुआ गाव अशा दोन ठिकाणांवरून संघर्षाची घटना घडली. यात सुमारे 18 जण जखमी झाले. आम्ही अहवाल पॅनेलला पाठविला आहे. दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत, 'अशी माहिती पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.

बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान, 2 मे रोजी निकाल
पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी 8 टप्प्यांत मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 79.79 टक्के मतदान झाले. बंगालमध्ये सध्या तृणमूल कॉंग्रेसचे सरकार आहे. 2017 मध्ये टीएमसीने येथे 211 जागा जिंकल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने येथील 42 पैकी 18 जागा जिंकल्या. त्यामुळे यावेळी थेट भाजप आणि टीएमसी यांच्यात थेट स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.
 

 

संबंधित बातम्या