कोरोनाचा नवा अवतार भारतामध्येही पोहचला

दैनिक गोमंतक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा अधिक संसर्गजन्य असा  नवा अवतार भारतामध्येही पोचल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा अधिक संसर्गजन्य असा नवा अवतार भारतामध्येही पोचल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकातील तीन, तमिळनाडू, तेलंगण आणि आंध्रप्रदेशात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.  हे बाधित काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधून भारतात आले होते.

यातील तिघांचे नमुने हे बंगळूर, दोघांचे हैदराबाद आणि एकाचा पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तमिळनाडू, तेलंगण आणि आंध्रप्रदेशातील प्रत्येकी एकास नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. अन्य तिघे बाधित हे कर्नाटकातील आहेत. दरम्यान हा नवा विषाणू अद्याप मुंबईमध्ये पोचलेला नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व बाधितांना खबरदारीचा उपाय म्हणून वेगळ्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले होते. आता या बाधितांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा कसून शोध घेतला जात असून त्यांचेदेखील विलगीकरण करण्यात येत आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळामध्ये ब्रिटनमधून जवळपास ३३ हजार नागरिक मायदेशी परतले आहेत.

संबंधित बातम्या