या मार्गांवर धावणार 6 विशेष रेल्वे गाड्या; भारतीय रेल्वेचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

भारतीय रेल्वेने गुरुवारी आणखी 6 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गुरुवारी आणखी 6 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे राखीव असणार आहेत. 
आहेत. लॉकडाऊन व कोरोना साथीदरम्यान रेल्वेने कोणतीही नियमित गाड्यांची वाहतूक सुरू केलेली नाही. सर्व गाड्या विशेषपणे चालवल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी विशेष गाड्यांची संख्या वाढवत आहे. गुरुवारी उत्तर रेल्वेने आणखी 6 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर-चंदीगड, इंदूर-उधमपूर, इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल्स-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली दरम्यान धावतील. 

टाइम मासिकच्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची वर्णी 

या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या धावतील

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यात संबंधित प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे इंदूर - दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर - चंदीगड, इंदूर - उधमपूर, संबंधीत लोकांना कळविण्यात आले असल्याचे लिहिले आहे. इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली या मार्गावर विशेष गाड्या चालवतील.

Farmer protest : ’आम्ही शेतीही करु आणि आंदोलनही सुरु ठेऊ

या आहेत विशेष रेल्वे गाड्या 

  • 09337/09338 इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला-इंदूर साप्ताहिक विशेष ट्रेन
  • 09307/09308-इंदूर-चंदीगड-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन
  • 09241/09242 इंदूर-उधमपूर-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन
  •  09325/09326  इंदूर-अमृतसर-इंदूर द्वि-साप्ताहिक विशेष   ट्रेन
  • 02909/02910 बांद्रा टर्मिनस-हज़रत निज़ामुद्दीन-बांद्रा टर्मिनस गरीब रथ सुपर फास्ट आठवड्यातून 3 दिवस एक्सप्रेस विशेष ट्रेन
  • 09009/09010 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंटो सुपर फास्ट एक्स्प्रेस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस विशेष ट्रेन
     

संबंधित बातम्या