कर्नाटकच्या मेडीकल कॉलेजचे 66 विद्यार्थी कोविड पॉझीटीव्ह, दोन वसतिगृहे सील

महाविद्यालयात नुकतेच एका कार्यक्रमाला विद्यार्थी गेले असल्याने कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या वाढली
कर्नाटकच्या मेडीकल कॉलेजचे 66 विद्यार्थी कोविड पॉझीटीव्ह, दोन वसतिगृहे सील
66 students of Karnataka Medical College Covid positive two hostel sealed Dainik Gomantak

कर्नाटकातील (Karnatak) धारवाडमध्ये 66 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Covid positive)आला असून, दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत. या वृत्ताला दुजोरा देताना धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील म्हणाले की, महाविद्यालयात नुकतेच एका कार्यक्रमाला विद्यार्थी गेले असल्याने कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या वाढली असेल.

66 students of Karnataka Medical College Covid positive two hostel sealed
कोविड लसीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न कौतुकास्पद: मडकई भाजप

पॉझिटिव्ह येणारे सर्व विद्यार्थी प्रथम वर्षाचे आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे इतर राज्यातील आहेत. खबरदारी म्हणून एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स अँड हॉस्पिटलची दोन वसतिगृहे सील करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनीही परिसराची नाकेबंदी केली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी उपायुक्तांनी मेडिकल कॉलेजला भेट दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com