इंदूरमध्ये दुमजली इमारतीला भीषण आग, जिवंत जळाल्याने सात जणांचा मृत्यू, आठ जण गंभीर

घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते, बहुतेकांचा झोपेत भाजल्याने आणि गुदमरून मृत्यू झाला
इंदूरमध्ये दुमजली इमारतीला भीषण आग, जिवंत जळाल्याने सात जणांचा मृत्यू, आठ जण गंभीर
Madhya Pradesh fire brokeANI

मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत एका घराला भीषण आग लागून सात जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. त्यावेळी या घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते, बहुतेकांचा झोपेत भाजल्याने आणि गुदमरून मृत्यू झाला. या आगीत आठ जण गंभीर जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Madhya Pradesh fire broke)

अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही. ही वसाहत इंदूरच्या विजय नगर भागात आहे. ही आगीची घटना शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच विजय नगर पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले. आगीत बळी गेलेले बहुतांश रूग्ण भाडेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Madhya Pradesh fire broke
''डिनर पॉलिटिक्स'', अमित शहांचा 'दादा' च्या घरी डिनर
Madhya Pradesh fire broke
हवामानाचा मूड बदलणार, पुढील आठवड्यात पुन्हा उष्णतेची लाट येणार

इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी सात जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली आणि नंतर हळूहळू संपूर्ण घरात पसरली. या आगीने इतके भयंकर रूप धारण केले की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. आणि सात जणांचा मृत्यू झाल्याचे या अपघाताबाबत सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.