हायवेवर 'अजब चोरीची गजब कहानी' 7 कोटी रुपयांच्या मोबाइल्सनी भरलेला ट्रकच पळवला

ट्रकमध्ये 8,990 मोबाईल होते, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये होती.
7 crore mobile phones looted on Mathura Highway
7 crore mobile phones looted on Mathura HighwayDainik Gomantak

मथुरा हायवेवर (Mathura HighWay ) एक अजबच प्रकार घडला आहे. इथ अशा प्रकारे चोरी झाली आहे की हे ऐकून सगळेच बुचकाळ्यात पडत आहेत. झालं असं की इथं एका ठिकाणी दोघा जणांनी पहिल्यांदा ड्रायव्हरला मारहाण करत त्याला वाहनातून फेकून दिले आणि नंतर ट्रकमधून जवळपास 7 कोटी रुपये किमतीचे सुमारे 9,000 मोबाईल फोन (Mobile Phone) लुटले आहेत.हा ट्रक बेंगलोरला जात होता.

या चोरी प्रकरणाची माहिती , “ओप्पो मोबाईल कंपनीचे व्यवस्थापक सचिन मानव यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, फर्रुखाबाद जिल्ह्याचा चालक मनीष यादव 5 ऑक्टोबर रोजी ग्रेटर नोएडा मधून मोबाईल फोन लोड केल्यानंतर बेंगळुरूला निघाला होता . फराह पोलीस स्टेशन परिसरातील ग्वाल्हेर बायपासवरून प्रवासी म्हणून दोन जण वाहनात चढले आणि त्यांनी ही चोरी केली आहे. ” असे पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी दिली आहे.

मोबाईल असलेल्या ट्रकने झाशीतील बबीना टोल ओलांडताच मध्यप्रदेशातील शेओपूर जिल्ह्यात बदमाशांनी चालकाला मारहाण केली आणि वाहनाबाहेर फेकून दिले आणि ट्रक घेऊन पळून गेले , असे पोलिसांनी सांगितले आहे . नंतर ते दोघे श्योपूर जिल्ह्यातील मानपूर पोलीस स्टेशन परिसरात रिकामा ट्रक सोडून पळून गेले,अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. तक्रारदाराने आरोप केला आहे की त्याने या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला होता, तथापि, त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला . त्यानंतर आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली,आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

7 crore mobile phones looted on Mathura Highway
Indian Railway Recruitment: 1 डिसेंबरपर्यंत करता येणार 1600 पदांसाठी अर्ज

हा ट्रक आता मध्य प्रदेशातील मानपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. एसपी म्हणाले की, ट्रकमध्ये 8,990 मोबाईल होते, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये होती.या प्रकरणाच्या तपासासाठी एक पोलीस पथक तयार करण्यात आले असून मध्यप्रदेश पोलिसांशीही या प्रकरणी संपर्क साधला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पाळत ठेवून बदमाशांचे स्थान शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे एसपी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com