कर्नाटकात भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

कर्नाटकात एका भीषण (Karnataka Accident) अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकात भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू
8 dead in Karnataka Accident near Chintamani aap92Dainik Gomantak

कर्नाटकात एका भीषण (Karnataka Accident) अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे (8 dead in Karnataka Accident ). चिंतामणी (Chintamani) परिसरातील मारनायकनहल्ली जवळ हा अपघात झाला असून येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीपने लॉरीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे . याबाबत माहिती देताना चिकबलपूर पोलिसांनी सांगितले की, हा अपघात आदल्या दिवशी घडला आहे. सांगितले जात आहे की एका जीपमढील लोक महामार्गाकडे जात असताना हा अपघात घडला आहे .पोलीस अधिकारी आणि चिंतामणीचे आमदार जे. कृष्णा रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (8 dead in Karnataka Accident near Maranayakanahalli , Chintamani)

या वर्षाच्या सुरुवातीला, 15 जानेवारी रोजी राज्यात एक वेदनादायक रोड अपघात झाला होता. या दरम्यान 11 लोकांचा मृत्यू झाला होता . अहवालानुसार, धारवाडमधील इतिगट्टीजवळ मिनीबस आणि टिप्पर यांच्यात टक्कर झाली होती . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या जीवनाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केली होती आणि म्हटले होते की, या दु:खाच्या वेळी ते पीडितेच्या कुटुंबासोबत उभे आहेत.

8 dead in Karnataka Accident near Chintamani aap92
Monsoon Update: पुढील चार दिवसात या 9 राज्यांत मुसळधार पाऊस

तर काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील(Karnataka) बेंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगला (Koramangala) भागात कार अपघातात (Karnataka Accident) सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती . ऑडी क्यू 3 रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्याने हा अपघात झाला होता . कोरमंगला येथे झालेल्या भीषण अपघातात कारमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com