हैदराबादमधल्या 8 सिंहांना कोरोनाची लागण!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

8 सिहांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. फक्त माणसंच नाही तर आता प्राणीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं समोर येत आहे. हैदराबादमधील (Hyderabad) 8 सिहांना (lion) कोरोनाची लागण झाली आहे. प्राणी संग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाबाधित सिहांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता सुस्थिर आहे. (8 lions in Hyderabad infected with corona)

या परिसरात खबरदारीच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येत असून प्राणी संग्रहालयामध्ये आता बाहेरील लोकांना येण्यास बंदी घातली आहे. सिंहांना कोरडा खोकला, नाक सतत वाहनं, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशा प्रकारची लक्षणं जाणवत असल्याचं प्राणि संग्रहालयातील केअरटेकर्सच्या लक्षात आलं होतं.

दक्षिण भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट;15 पटींनी वाढला मृत्यूचा धोका

यआगोदर अन्य देशामधील प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. मात्र भारतात प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हैदराबादमधील या प्राणिसंग्रहालयातील 12  हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
 

संबंधित बातम्या