छत्तीसगढमध्ये ८ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यात तीन इनामी नक्षलवाद्यांसह ८ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लोन वर्राटु (घरी परत या) या अभियानांतर्गत आज ८ नक्षलवाद्यांना परत आणण्यात दंतेवाडा पोलिसांना यश आले आहे.  

दंतेवाडा- छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यात तीन इनामी नक्षलवाद्यांसह ८ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लोन वर्राटु (घरी परत या) या अभियानांतर्गत आज ८ नक्षलवाद्यांना परत आणण्यात दंतेवाडा पोलिसांना यश आले आहे.  

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये भैरमगढ भागातील प्लाटून नंबर १३ चा सेक्शन सी कमांडर आयतू भास्कर (२५), एरिया कमेटी नाट्य मंडळीचा अध्यक्ष राजू कारम(२५), भूमकाल मिलिशिया कमांडर महेश कुमार डोडी(२६), भूमकाल मिलिशिया सेक्शन ए चा कमांडर लखमा ताती (२२), सीएनएम  सदस्य भीमा बारसे(२८), जनमिलिशिया सदस्य सोना ताती (२०), जनमिलिशिया सदस्य माडका बारसे(२१) आणि मलांगेर एरिया कमेटीचा सप्लायर पिट्टे उर्फ भीमा मांडवी(३५) यांनी पोलिसांत आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी आयतू भास्कर याच्यावर तीन लाख रूपये तर राजू कारम आणि महेश कुमार डोडी यांच्यावर एक-एक लाख रूपयांचा इनाम ठेवण्यात आला होता. या नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांवर हल्ला करणे, गावकऱ्यांच्या हत्या करणे, वाहने पेटवणे तसेच शासकीय संपत्तीचे नुकसान करणे, असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. नक्षलवादी भीमा बारसे, सोना ताती,  माडता बारसे आणि पिट्टे  यांनी २०१९ भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनाचा स्फोट घडवून आणण्यात सामील होते. या घटनेत आमदार मांडवी यांचा मृत्यूही झाला होता. 
 

संबंधित बातम्या