१२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष गाड्या धावणार

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे थांबलेली रेल्वेची चाके पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली: कोरोनामुळे थांबलेली रेल्वेची चाके पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे आहेत. येत्या १२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष गाड्या धावणार असून, यासाठी आरक्षणाची प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी केली आहे. राज्यांच्या मागणीनुसार परीक्षांसाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ज्यादा गाडा सोडण्याची मागणी करण्यात आल्यास आम्ही त्याला देखील परवानगी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 विशेष म्हणजे नव्या यादीत महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दोन गाड्या आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना नंतर जारी केली जाईल असे सांगून यादव म्हणाले की, ‘‘ कोरोना काळात सुरू असलेल्या आधीच्या २३० गाड्यांच्या व्यतिरिक्त या ८० गाड्या (४० जोड्या) असतील. सध्या ज्या गाड्या धावत आहेत त्यांचा आढावा घेऊन ज्या मार्गांवर जास्त प्रतीक्षा यादी आहे त्या स्थानकांसाठी मूळ गाडीच्या पाठोपाठ आणखी एक गाडी (क्‍लोन ट्रेन) सोडली जाणार आहे. 

संबंधित बातम्या